भाऊबीजेला पंकजा मुंडेंनी 'या' भावाला ओवाळलं

भाऊबीजेला पंकजा मुंडेंनी 'या' भावाला ओवाळलं

राज्याचे मंत्री महादेव जानकर हे पंकजाताईंना बहीण मानतात गेली अनेक वर्ष ते रक्षाबंधन आणि भाऊबीजेला पंकजाताईंच्या घरी जातात आणि नंतर ओवाळणी होती.

  • Share this:

मुंबई 29 ऑक्टोंबर : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत परळीत पराभव झाला. हा पराभव भाजपसाठी धक्कादायक होता असं खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं होतं. त्यामुळे पंकजाताई सध्या काय करतात असा प्रश्न विचारला जातोय. राज्याचे मंत्री महादेव जानकर हे पंकजाताईंना बहीण मानतात गेली अनेक वर्ष ते रक्षाबंधन आणि भाऊबीजेला पंकजाताईंच्या घरी जातात आणि नंतर ओवाळणी होती. दोघांमधल्या या बहीण-भावाचं नात्याला गोपीनाथ मुंडे असल्यापासून सुरूवात झाली. जानकर न चुकता या दोनही दिवशी पंकजाताईंच्या घरी येतात आणि पंकजाताई त्यांना पाहुणचार करतात. राजकारणात असूनही असं नातं जपता येतं हे त्यांनी दाखवून दिलंय. अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांनी या आपल्या नात्याचा उल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केलीय.

परळीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी दिवाळी मुंबईतल्या घरी साजरी केली. त्या तीनही दिवस मुंबईतच होत्या. कार्यकर्त्यांनीही त्यांना मुंबई येऊन शुभेच्छा दिल्या. परळीतला हा पराभव त्यांच्या खूपच जिव्हारी लागलाय.मात्र लोकांचा कौल मान्य असून यापुढेही परळीतल्या लोकांसाठी काम करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. लोकांसाठी एवढं काम करूनही हा पराभव का झाला हे मला कळत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती.

पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असला तर मुंडे यांना मानणारा मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. जनाधार असल्याने केवळ पराभव झाला म्हणून पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळाबाहेर ठेवलं जाणार नाही असं बोललं जातंय. या निवडणुकीत भाजपला धक्का बसल्यानं जनाधार असलेल्या नेत्यांना डावललं जाणार नाही. सुरेश धस आणि मराठवाड्यातल्या अनेक आमदारांनी पंकजा मुंडे यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तीन दिवसांपूर्वीच भेट घेतली होती.

धनंजय मुंडे यांचा बीड जिल्ह्यातल्या प्रभाव कमी करण्यासाठी आणि राजकीय वर्चस्व कायम राखण्यासाठी पंकजा मुंडे यांच्याशीवाय सध्यातरी कुठलाही पर्याय नाही. त्यामुळे पंकजा मुंडे यांना मंत्रिमंडळात घेऊन त्यांना विधान परिषदेवर पाठवलं जाऊ शकते अशी शक्यता व्यक्त केली जातेय. तिकीट नाकारल्यामुळे आधीच एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे असे अनेक दिग्गज मंत्री दुखावले गेले आहेत. त्यामुळे भाजप श्रेष्ठी अतिशय सावधपणे पावलं टाकत आहेत.

Tags:
First Published: Oct 29, 2019 10:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading