दिवाळीनिमित्त लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक रद्द, पाहा वेळापत्रक

दिवाळीनिमित्त लोकलच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक रद्द, पाहा वेळापत्रक

दिवाळीनिमित्तानं प्रवाशांना रविवारी आणि सोमवारी मोठा दिलासा.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर: दिवाळीनिमित्तानं रेल्वे प्रशासनानं खास रविवारी मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य, हर्बर, पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नसल्यानं प्रवासी आणि चाकरमन्यांना दिलासा मिळाला आहे. रविवारी 27 ऑक्टोबर आणि सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी रविवारच्या वेळापत्रकानुसार लोकल धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. तर दिवाळीसाठी रेल्वेकडून काही जादा लांब पल्ल्यांच्या गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या गाड्या डिसेंबरपर्यंत सुरू राहतील. मात्र लोकलचं वेळापत्रक हे रविवारनुसार असल्यानं त्यादिवशी प्रवाशांना गर्दीला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. अंधेरी ते बोरिवली दरम्यान मध्यरात्री 12 ते पहाटे 4.30 पर्यंत अप-डाऊन दोन्ही दिशेकडील मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावरून वळण्यात येतील.

रविवारी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन तर सोमवारी दीपावली पाडवा असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक न घेता रविवारच्या वेळापत्रकानुसार गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून काही तिकीट खिडक्या सुरू राहातील तर काही बंद असतील. मात्र एकूणच मेगाब्लॉक नसला तरी प्रवशांना मोठ्या गर्दीचा सामना करावा लागणार आहे.

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 11:08 AM IST

ताज्या बातम्या