मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना परिवहन मंडळाची मदत

मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांना परिवहन मंडळाची मदत

ज्या ४० तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला एसटी महामंडळात नोकरी दिली जाणार असल्याचं दिवाकर रावते यांनी जाहीर केली.

  • Share this:

प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 01 डिसेंबर : मराठा आरक्षणासाठी आंदोलनात ४० जणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मृतांच्या कुटुंबियांपैकी एकाला एसटी महामंडळात नोकरी देणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे.

मराठा समाजाला राज्य सरकारने १६ टक्के आरक्षण दिले आहे. या कायद्याची अंमलबजावणी आजपासून राज्यभरात लागू झाली आहे. परंतु, या आंदोलनादरम्यान ४० जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

गुरुवारी आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर आज परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आंदोलनात मृत तरुणांच्या कुटुंबियांना मदतीचा हात पुढे केला आहे. ज्या ४० तरुणांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांपैकी एकाला एसटी महामंडळात नोकरी दिली जाणार असल्याचं दिवाकर रावते यांनी जाहीर केली.

ज्या तरुणांचा आंदोलनादरम्यान मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना सरकारने मदत करावी या आणि इतर १९ मागण्यासाठी आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलं होतं.

मराठा आंदोलनादरम्यान औरंगाबाद जिल्ह्यात कायगाव टोका इथं काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी ४० मराठा तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केली होती.

72 हजार पदासांठी होणार मेगाभरती

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही महत्वाची घोषणा केली. राज्यातल्या विविध 72 हजार पदासांठी ही मेगाभरती राज्य सरकारनं घोषित केली होती मात्र त्यावर वाद झाल्याने ती थांबवण्यात आली होती.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना अशी भरती का करण्यात येत आहे असा सवाल विरोधी पक्षांसह विविध संघटनांनी विचारला होता. त्यावर मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवून इतर पदांसाठी भरती आहे असा सरकारचा युक्तिवाद होता. मात्र जास्त विरोध झाल्याने शेवटी सरकारला हा निर्णयच स्थगित करावा लागला. आता आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागल्यानं सरकारनं ही मोठी घोषणा केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2018 06:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading