S M L

पावसाला सुरुवात होऊनही दिव्यातील नाले तुंबलेलेच !

दिव्यातील ठेकेदाराने शहराच्या अंतर्गत भागात असलेल्या लहान गटारांची सफाई केली आहे, मात्र तेही काम अर्धवट केले आहे.

Sachin Salve | Updated On: Jun 9, 2017 08:44 PM IST

पावसाला सुरुवात होऊनही दिव्यातील नाले तुंबलेलेच !

प्रदीप भणगे, दिवा

09 जून : ठाणे महापालिका हद्दीच्या वेशीवर असलेल्या दिवा शहरातील नाले मात्र अद्याप कचऱ्याने तुंबलेलेच दिसत आहेत. दिव्यातील ठेकेदाराने शहराच्या अंतर्गत भागात असलेल्या लहान गटारांची सफाई केली आहे, मात्र तेही काम अर्धवट केले आहे.

मोठय़ा नाल्यांच्या सफाईला तर अद्याप सुरुवातही झालेली नाही. ठाणे महापालिकेत 8 जागावर शिवसेनेचे उमेद्वार निवडून आले. दिवा शहरातील रमाकांत मढवी यांना उपमहापौरपद पण दिले. ठाणे महापालिकेत एक सत्ता शिवसेनेची असून स्थानिक आमदार सुभाष भोईर हे पण शिवसेनेचे आहे. तरी सुद्धा नाले सफाईकडे अद्याप कोणीच लक्ष दिलेले नाही.दिवा शहरात मोठय़ा प्रमाणात बैठय़ा चाळी असून पावसाळ्यात येथील घरांत पाणी शिरण्याच्या घटना घडतात. काही चाळींच्या लगतच दलदलीचा परिसर असल्याने आणि सांडपाणी वाहून जाण्यास नालाच नसल्याने पावसाळ्यात सांडपाण्याचे तळे साचल्यासारखीच परिस्थिती निर्माण होते. चाळीतील नागरिकही या नाल्यातच कचरा टाकत असल्याने येथील नाल्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कचरा जमा झालेला आहे.

हे नाले तुंबलेले....

बेडेकरनगर नाला, तिसाईनगर नाला-दातिवली रोड, वक्रतुंडनगर नाला, मुंब्रादेवी कॉलनी रोडलगतचा नाला, ग्लोबल इंग्लिश स्कूलजवळील नाला, दिवा आगासन रोड, दिवा-शीळ रोड येथील नाले कचऱ्याने भरून वाहत आहेत.

Loading...
Loading...

दरम्यान, शहरातील छोटे नाले सफाईला सुरवात झाली असून दिव्यात पहिल्या नदीचे नालेसफाई होत आहे. मोठया नाल्याची सफाई येत्या 3 दिवसात पुर्ण होईल  अशी माहिती उपमहापौर रमाकांत मढवी यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 08:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close