Home /News /mumbai /

Mumbai Crime News: कुत्र्याशी खेळण्यावरुन वाद चाकूनं वार; मुलाचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Mumbai Crime News: कुत्र्याशी खेळण्यावरुन वाद चाकूनं वार; मुलाचा मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Mumbai Crime News: क्षुल्लक कारणानं एका मायलेकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 20 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

    मुंबई, 02 जून: मुंबईतील नेहरु नगरमधून (Nehru Nagar) एक धक्कादायक बातमी समोर येतेय. क्षुल्लक कारणानं एका मायलेकावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात 20 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर आई रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बुधवारी रात्री 8.30 च्या सुमारास नेहरू नगर परिसरात झालेल्या किरकोळ भांडणात आई आणि मुलावर चाकूनं वार करण्यात आलेत. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले होते. जखमी अवस्थेत दोघांनाही जवळच्या कूपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र यात 20 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आई अजूनही मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम 302 आणि 307 नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. काय आहे नेमकी घटना पीडितेच्या मुलानं दिलेल्या माहितीनुसार, त्याची आई तिच्या 3 वर्षाच्या नातवासोबत घराबाहेर बसली होती. मुल शेजारी बसलेल्या कुत्र्याशी खेळत होते. तेवढ्यात 55 वर्षीय शेखर नायर आला आणि महिलेला शिवीगाळ करू लागला. त्यानंतर महिलेचं शेखरशी भांडणही सुरू झालं. याचवेळी महिलेचा 20 वर्षाचा मुलगा सूरज कनोजिया हाही येतो. याचवेळी शेखरने आई आणि मुलावर चाकूने वार करून तेथून पळ काढला. कुटुंबीयांच्या मदतीने दोन्ही आई मुलाला कूपर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे सुरज कनोजियाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर सूरजची आईही जीवन-मरणाशी झुंज देत आहे. अमेरिकेत पुन्हा गोळीबाराचा थरार; हॉस्पिटल कॅम्पसजवळ चार जण ठार, अनेक जखमी या प्रकरणी जुहू पोलिसांनी आरोपी शेखर नायर याच्याविरुद्ध कलम 302 आणि 307 नुसार हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शेखर नायरला अटक केली असून सध्या शेखरची चौकशी सुरू आहे. तर पीडित कुटुंब न्यायासाठी याचना करत आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या