उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, चव्हाणांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत ठिणगी

उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढली, चव्हाणांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत ठिणगी

महाविकास आघाडी सरकारला आता तीन महिने पूर्ण होताहेत. मात्र आघाडीतल्या कुरबुरी संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. एक वाद संपला की दुसरा वाद तयार होतो.

  • Share this:

मुंबई 27 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारला आता तीन महिने पूर्ण होताहेत. मात्र आघाडीतल्या कुरबुरी संपण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. एक वाद संपला की दुसरा वाद तयार होतो. एका नेत्याने वक्तव्य दिलं की दुसरा नेता त्यावर प्रतिक्रिया देतो आणि पक्षांमध्ये संवाद नाही, विसंवाद आहे असं चित्र निर्माण होतं. आता पुन्हा एकदा नवा वाद निर्माण झालाय तो सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे. महाआघाडीत येताना घटनेप्रमाणच काम करणार असं आम्ही शिवसेनेकडून लिहून घेतलं असं वक्तव्य चव्हाण यांनी नांदेड इथं बोलताना केलं होतं. त्यावर आता चर्चा सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

आम्ही घटनेप्रमाणेच काम करतो. काही लिहून द्यायचा प्रश्नच नाही असं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगत अशोच चव्हाणांना फटकारलं. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशोक चव्हाणांनी असं का व्यक्तव्य केलं ते माहित नाही असं सांगत कानावर हात ठेवले.

लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला बसणार धक्का, दिल्लीत मोदींचाच झेंडा

अशोक चव्हाणांचं म्हणणं शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावलंय. शिवसेनेनं काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही असं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी पुढे सांगितलं की, सरकार हे राज्यघटनेने सांगितलेल्या तत्वांप्रमाणेच काम करत असते त्यामुळे काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही. अशोक चव्हाण यांनी कुठल्या संदर्भात हे विधान केलं ते माहित नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव सरकारवर नजर ठेवण्यासाठी राज ठाकरे घेणार आज मोठा निर्णय

काय म्हणाले अशोक चव्हाण?

अशोक चव्हाण म्हणाले, तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांचं सरकार आलं तर भांडणं होतं असं सोनिया गांधी यांना वाटत होतं. त्यामुळे सत्तेत सहभागी होऊ नये असं त्यांचं मत होतं.

शिवसेना घटनाबाह्य काम करेल अशी भीतीही त्यांना वाटत होती. त्यामुळे आम्ही शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांना ते स्पष्टपणे सांगितलं आणि त्यांनीही घटनाबाह्य काम होणार नाही याचं आश्वासन दिलं अशी माहितीही त्यांनी दिली.

आता रात्रीही करा Enjoy, मुंबईत आजपासून नाईट लाईफ सुरू

ते पुढे म्हणाले, शिवसेनेने कुठलंही घटनाबाह्य काम केलं तर काँग्रेस सत्तेत राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. ज्या दिवशी सरकार आलं त्याच दिवशी हे ठरलंय असंही ते म्हणाले.

First published: January 27, 2020, 3:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading