‘मनसे मतभेद’, आंदोलनामध्ये नांदगावकर-देशपांडे यांच्यात वाद

‘मनसे मतभेद’, आंदोलनामध्ये नांदगावकर-देशपांडे यांच्यात वाद

मनपा अधिका-याला जाब विचारण्यापेक्षा मनसे नेत्यांच्या मतभेदांनीच हे आंदोलन गाजले

  • Share this:

मुंबई, 1 नोव्हेंबर : कुर्ला येथील एल वॉर्डमधल्या एका आंदोलनादरम्यान मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळालं. या वादानंतर संदीप देशपांडे यांनी आंदोलनातून काढता पाय घेतला आहे.

मुंबईतील एल वॉर्ड इथल्या मनपा अधिका-यांना जाब विचारण्यासाठी मनसेचे नेते-कार्यकर्ते जमा झाले होते. या अधिका-यांना आक्रमकपणे जाब विचारला गेला पाहिजे, असा संदीप देशपांडे यांचा आग्रह होता. तर सौम्यपणे चर्चा केली पाहिजे, अशी नांदगावकर यांची भूमिका होती. यावरुनच पक्षाचे कार्यकर्ते आणि मनपा अधिकारी यांच्यासमोरच देशपांडे आणि नांदगावकर यांच्यातले मतभेद उघड झाले. आणि त्यानंतर देशपांडे यांनी त्या आंदोलनातून काढता पाय घेतला.

मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांच्या वॉर्डात विकास कामं होऊ देत नसल्याचा आरोप करत मनसेनं जाब विचारण्यासाठी कुर्ल्यातलं एल वॉर्ड ऑफिस गाठलं. ज्या कंत्राटदाराला मारहाण केल्याप्रकरणी तुर्डे ५५ दिवस जेलमध्ये गेले होते त्याला स्थायी समितीची परवानगी नसतानाही तो कशी काय कामं करु शकतो, असा सवाल पक्षानं विचारला. तर यामागे इतर पक्ष आहेत असा देशपांडे यांचा आरोप होता.

नगरसेवकांना कोणत्या कामासाठी निधी दिला जाऊ शकतो याचं उत्तर देण्यासाठी 15 दिवसांची मुदत मनपा अधिका-यांनी मागितली. त्यावर आक्षेप घेत देशपांडे यांनी आक्रमक भूमिका घेतली. पण सौम्यपणे चर्चा करण्याची नांदगावकर यांची भूमिका होती. यावरुनच दोन्ही नेत्यांमधील मतभेद उघड झाले. मनपा अधिका-याला जाब विचारण्यापेक्षा मनसे नेत्यांच्या मतभेदांनीच हे आंदोलन गाजले.

दरम्यान, अशाच अंतर्गत मतभेदांमुळे आतापर्यंत अनेक बड्या नेत्यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे नेत्यांच्या या उघड मतभेदानंतर राज ठाकरे स्वत: याबाबत मध्यस्थी करणार का, हे पाहावं लागेल.

 VIDEO बेळगावात मराठी तरुणांच्या मूक मोर्चावर कर्नाटक पोलिसांचा लाठीमार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 1, 2018 02:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading