मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलाचं फोडलं नाक-तोंड, पोलीस कर्मचाऱ्याला तीन वर्षांचा कठोर तुरुंगवास

क्षुल्लक कारणावरुन अल्पवयीन मुलाचं फोडलं नाक-तोंड, पोलीस कर्मचाऱ्याला तीन वर्षांचा कठोर तुरुंगवास

37 वर्षीय बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबलला 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन वर्ष  कठोर कारावासाची शिक्षा (Rigorous Imprisonment) सुनावण्यात आली आहे.

37 वर्षीय बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबलला 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन वर्ष कठोर कारावासाची शिक्षा (Rigorous Imprisonment) सुनावण्यात आली आहे.

37 वर्षीय बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबलला 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन वर्ष कठोर कारावासाची शिक्षा (Rigorous Imprisonment) सुनावण्यात आली आहे.

मुंबई, 20 ऑक्टोबर: मुंबईतल्या एका बडतर्फ पोलीस कर्मचाऱ्याला (Dismissed police constable) तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 14 वर्षांच्या मुलाला केलेली मारहाण या पोलिसाच्या चांगलीच अंगलट आली आहे. 37 वर्षीय बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबलला 14 वर्षांच्या शालेय विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी तीन वर्ष कठोर कारावासाची शिक्षा (Rigorous Imprisonment) सुनावण्यात आली आहे.

हे प्रकरण 2016 मधलं आहे. या बडतर्फ आणि दोषी पोलीस कर्मचाऱ्यानं एका 14 वर्षांच्या मुलाला मारहाण केली. या मारहाणीत कर्मचाऱ्यानं मुलाचं नाक आणि तोंड फोडलं (Bloody Nose And Mouth) होतं. ज्यात तो रक्तबंबाळ झाला होता. धक्कादायक म्हणजे या पोलीस कर्मचाऱ्यानं त्या मुलाला त्याच अवस्थेत सोडून गेला होता. 2016 मध्ये दादर बस स्टॉपजवळ पोलिसाच्या पार्क केलेल्या स्कूटरवर टेकून उभा राहिल्यामुळे त्यानं या मुलाला मारहाण केली होती.

हेही वाचा- SSC HSC Board Supplementary Exam Result: दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज; येथे चेक करा RESULT 

आरोपी शैलेश कदम याने अल्पवयीन मुलाला त्याच्या इमारतीच्या खिडकीतून बस स्टॉपच्या मागे पाहिले, त्यानंतर त्याला ओरडला आणि नंतर खाली येऊन त्याला मारहाण केली.

न्यायालयाने म्हटले की आरोपीने त्याच्या वयाचा विचार न करता क्षुल्लक कारणावरुन विद्यार्थ्याला निर्घृणपणे मारहाण केली. महानगर दंडाधिकारी प्रवीण पी देशमाने म्हणाले की, हे प्रकरण गंभीर आहे कारण आरोपी एक पोलीस कर्मचारी होता आणि असहाय्य, लहान मुले आणि गरजू व्यक्तींचे संरक्षण करणे हे त्याचे कर्तव्य होतं.

हेही वाचा- T20 World Cup: धोनी ड्रेसिंग रूममध्ये परतल्यानंतर काय बदललं? राहुलनं दिलं उत्तर

न्यायालयाने आरोपीला 50,000 रुपयांचा दंडही ठोठावला, त्यापैकी 25,000 रुपये पीडित अल्पवयीन मुलाला भरपाई म्हणून दिले जातील. मॅजिस्ट्रेट कोर्टाने असेही निदर्शनास आणून दिलं की, याआधी आरोपीवर विनयभंगाच्या अनेक प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:
top videos

    Tags: Police