मुंबईत पावसानंतर आता रोगराईची भीती

मुंबईत पावसानंतर आता रोगराईची भीती

रस्तोरस्ती साचलेल्या पाण्यातून लोकांना चालत जावं लागल्यामुळे आता रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट: मंगळवारच्या मुसळधार पावसानंतर आज कुठे मुंबई सावरते आहे. मात्र आता मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे. रस्तोरस्ती साचलेल्या पाण्यातून लोकांना चालत जावं लागल्यामुळे आता रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

कंबरभर पाण्यातून चालत जाण्याचा निर्णय मंगळवारी अनेक मुंबईकरांनी घेतला होता. नऊ-दहा तास चालत अनेकांनी घर गाठले. त्यामुळे अंगदुखीने, तापाने मुंबईकर हैराण झाले होते. खोकला, अंगदुखी, कणकण, पाय दुखण्यासह, दूषित पाण्यामुळे, गारठ्याने हातापायाची अनेकांची त्वचाही सोलवटली आहे. अनेकांना त्वचेला खाज येत असून हातापायाला मुंग्याही येत असल्याचा त्रास मुंबईकरांना भेडसावत होता. त्यामुळे ताप अंगावर काढू नका असा सल्लही महापालिकेकडून देण्यात आला.

दरम्यान आता आरोग्याच्या मुद्दयावर मंत्रालयातही आज बैठक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 31, 2017 10:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading