मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अनलॉक-2 बाबत चर्चा सुरू, हॉटलेसह आणखी काय सुरू होण्याची आहे शक्यता? जाणून घ्या

अनलॉक-2 बाबत चर्चा सुरू, हॉटलेसह आणखी काय सुरू होण्याची आहे शक्यता? जाणून घ्या

कडक लॉकडाऊननंतर नियमांमध्ये शिथिलता आणत अनलॉकचा निर्णय घेतला. अनलॉक-1 च्या प्रक्रियेनंतर आता अनलॉक-2 बाबतही विचार सुरू झाला आहे.

कडक लॉकडाऊननंतर नियमांमध्ये शिथिलता आणत अनलॉकचा निर्णय घेतला. अनलॉक-1 च्या प्रक्रियेनंतर आता अनलॉक-2 बाबतही विचार सुरू झाला आहे.

कडक लॉकडाऊननंतर नियमांमध्ये शिथिलता आणत अनलॉकचा निर्णय घेतला. अनलॉक-1 च्या प्रक्रियेनंतर आता अनलॉक-2 बाबतही विचार सुरू झाला आहे.

मुंबई, 27 जून : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला. तसंच हातावर पोट असणाऱ्या वर्गाच्या जीवन-मरणाचा प्रश्न तयार झाला. ही परिस्थिती लक्षात घेत सरकारने चार टप्प्यांच्या कडक लॉकडाऊननंतर नियमांमध्ये शिथिलता आणत अनलॉकचा निर्णय घेतला. अनलॉक-1 च्या प्रक्रियेनंतर आता अनलॉक-2 बाबतही विचार सुरू झाला आहे.

अनलॉक 2 च्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सध्या आढावा घेत आहेत. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी ते चर्चा करत आहेत. राज्यात अनलॉक -1 च्या काळात विविध शहरांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनलॉक-2 करताना कितपत सूट द्यायची, असा प्रश्न सरकारसमोर आहे. मात्र अशा स्थितीतही काही गोष्टींबाबत शासन पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती आहे.

अनलॉक-2 बाबत काय आहे शक्यता?

- ज्या जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी वाढते आहे तिथे जैसे थे परिस्थिती ठेवावी

- सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वे सेवा बंद आहेत, आशा परिस्थिती मध्ये टॅक्सी ना परवानगी दिली जाईल?

- अनेक कार्यालय सुरू आहेत. अशा परिस्थितीत काही हॉटेल खानावळ उघडण्याची मागणी होत आहे. त्यामुळे याबाबत निर्णय होऊ शकतो.

- कुरिअर सेवा सुरू करण्याबाबत विचार होऊ शकतो

राज्यात काय आहे कोरोनाची स्थिती?

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.94 टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 8 लाख 96 हजार 874 नमुन्यांपैकी 1 लाख 59 हजार 133 नमुने पॉझिटिव्ह (17.74 टक्के) आले आहेत. राज्यात 5 लाख 65 हजार 161 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 36 हजार 925 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज 167 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. यापैकी 86 मृत्यू मागील 48 तासांमधील तर उर्वरित 81 मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.57 टक्के एवढा आहे.

मागील 48तासात झालेले 86 मृत्यू हे मुंबई मनपा-41, ठाणे मनपा-1,कल्याण-डोंबिवली मनपा-1, भिवंडी-निजामपूर मनपा-1, वसई-विरार मनपा-1, पनवेल मनपा-1, नाशिक-1. मालेगाव मनपा-1, धुळे-3, जळगाव-5, पुणे मनपा-15, पिंपरी-चिंचवड मनपा-3, सोलापूर मनपा-1, सातारा-1, कोल्हापूर-1 सांगली-1, औरंगाबाद -1, लातूर मनपा-1, उस्मानाबाद-1 या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

First published:

Tags: Coronavirus, Lockdown