Home /News /mumbai /

INSIDE STORY : फक्त कोरोना लॉकडाऊन नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत ELECTION PLANची चर्चा

INSIDE STORY : फक्त कोरोना लॉकडाऊन नाही, राष्ट्रवादीच्या बैठकीत ELECTION PLANची चर्चा

शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रिमंडळात सामील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक (NCP Sharad Pawar Meeting) आयोजित करण्यात आली होती.

मुंबई, 15 मार्च : गृहमंत्री अनिल देशमुख (Home minister Anil Deshmukh) यांच्या गच्छंतीच्या चर्चेने सध्या राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष राज्याच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. त्यातच पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत मंत्रिमंडळात सामील असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक (NCP Sharad Pawar Meeting) आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अनेक राजकीय मुद्द्यांवरून चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिमंडळ फेरबदल किंवा अनिल देशमुख यांचा राजीनामा या गोष्टींबाबत सार्वजनिक बैठकीत चर्चा करणं राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी टाळलं आहे. या बैठकीत प्रामुख्याने राज्यातील कोरोना स्थिती आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेच मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी होते. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक रणनीती याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीने आतापासूनच या निवडणुकांबाबत रणनीती आखण्यास सुरुवात केल्याने या निवडणुकांना राष्ट्रवादी हा पक्ष महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे सामोरा जाणार की 'एकला चलो रे'चा नारा देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा - जयंत पाटलांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट, अनिल देशमुखांच्या राजीनाम्याबद्दल केला वेगळाच दावा लॉकडाऊनबाबत काय आहे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची भूमिका? राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पुन्हा एकदा लोकांच्या हालचालींवर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या बैठकीतही चर्चा झाली. मात्र राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच मंत्र्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आणखी एक हायव्होल्टेज बैठक मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांची अटक आणि त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदावरून दूर करण्याबाबत होत असलेल्या चर्चेबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आता शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांची स्वतंत्र बैठक सुरू आहे. ही बैठक झाल्यानंतरच गृहमंत्र्यांच्या गच्छंतीबद्दल राष्ट्रवादीची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Anil deshmukh, NCP, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या