विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडीत धुसफूस

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडीत धुसफूस

विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी की नाही यावरून महाविकास आघाडीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

  • Share this:

मुंबई, 03 मार्च :  महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपद नाना पटोले (Nana Patole) यांनी राजीनामा दिल्यानंतर न रिक्त आहे. सध्या विना अध्यक्षपदाच्या शिवाय महाराष्ट्र विधानसभा अर्थसंकल्प अधिवेशनाचे कामकाज सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी की नाही यावरून महाविकास आघाडीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक जर लावली तर सभागृहांमध्ये बहुमत परत एकदा सिद्ध करावे लागेल यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्षपद असल्याने ही निवडणूक घ्यावी, असे मतप्रवाह काँग्रेसचा आहे पण दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मात्र याबाबत वेगळे मत आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक शक्य तो नको असा मतप्रवाह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे.

विशेष म्हणजे, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रश्न विचारला असता त्यांनी या संदर्भातील उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार देतील असं सूचक वक्तव्य केलं होतं आणि अजित पवार यांनी जर विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून सरकारवर अल्पमतात आहे, असा कोणी दावा केला तर संख्याबळाने सिद्ध करू, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांना लगावला होता.

जवळपास स्पष्ट होतं की, काँग्रेस विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी आग्रही आहे पण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस तितकीशी अनुकूल नाही या नेमक्या याच मुद्द्यावर महाविकास आघाडीत मतभेद होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या भूमिकेवर सांगितले की, 'येत्या काही दिवसात महाविकास आघाडीची नेत्यांची बैठक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस विधानसभा अध्यक्ष निवडणूक घेण्यात यावी यासाठी आग्रही भूमिका मांडली. अधिवेशन संपण्यापूर्वी निवडणूक व्हावी कारण की विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे आमची जागा रिक्त व्हायला नकोय तूर्तास विधानसभा अध्यक्षपद हे तात्पुरते उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नरहरी झिरवळ यांच्याकडे देण्यात आले आहे. नेमके यावरूनच काँग्रेस पक्षामध्ये नाराजीचा सूर आहे. महाराष्ट्र अर्थसंकल्प अधिवेशन सुरू असतानाच विधानसभा अध्यक्षपदावरून महाविकासआघाडी तील मतभेद डोकेदुखी ठरणार का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

Published by: sachin Salve
First published: March 3, 2021, 12:32 PM IST

ताज्या बातम्या