मुंबई 19 नोव्हेंबर: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला (BMC Election) एक वर्ष बाकी आहे. मात्र सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. भाजपचा भगवा पालिकेवर फडकविण्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. त्यानंतर काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी पालिका निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा केली. मात्र त्यांच्या या घोषणेनंतर काही तासांमध्येच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी रवी राजा यांच्यापेक्ष वेगळी भूमिका मांडली आहे त्यामुळे चव्हाट्यावर आले आहेत.
महाविकास आघाडी सरकार राज्यात आहे. त्यामुळे महापालिका निवडणूकीत आघाडी करण्यासाठी आग्रही राहणार आहे. रवी राजा यांचे मत हे वयक्तिक असून ते मत वेगळे असू शकते, काँग्रेस पक्षाला सन्मानजनक वागणूक दिली तर आघाडी करू असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही एकत्रित निवडणुका लढविण्याचे संकेत दिले होते. राज्यात महाविकास आघाडी एकत्र आहे हे पाहता मुंबई पालिकेसाठी तिन्ही पक्ष एकत्र येणं अभिप्रेत आहे. पण निवडणुकीला एक वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे. त्यामुळे चर्चा करून निर्णय घेऊ. निवडणुकीसाठीची चर्चा अजून सुरु करायची आहे त्यावर अजून भाष्य करु नये.
शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई आणि शिवसेना हे समीकरण घट्ट झालं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व आहे. मात्र आता शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. 2017 साली झालेल्या महापालिका निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरे गेले होते. तेव्हा शिवसेनेला सत्ता राखण्यात यश मिळालं असलं तरीही भाजप आणि शिवसेनेच्या जागांमध्ये फारसं अंतर नव्हतं.
धक्कादायक! मुंबईत 'बच्चा चोर' गॅंग पुन्हा सक्रिय, समोर आली हृदय हेलणारी घटना
या पार्श्वभूमीवर 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. शिवसेनेसोबत राज्याच्या राजकारणात संघर्ष होत असतानाच भाजपने मुंबई महापालिकेवरही लक्ष केंद्रीत केल्याने या निवडणुकीबाबत आगामी काळात जोरदार संघर्ष रंगण्याची शक्यता आहे.