परमबीर सिंग यांच्यानंतर आता पोलीस महासंचालकांनी टाकला लेटर बॉम्ब, गृहखात्यात खळबळ

परमबीर सिंग यांच्यानंतर आता पोलीस महासंचालकांनी टाकला लेटर बॉम्ब, गृहखात्यात खळबळ

विशेष म्हणजे, पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते.

  • Share this:

मुंबई, 03 मे: मुंबईचे (Mumbai) माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parmbir Singh) यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA Government) बरीच उलथापालथ झाली. आता पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांनीही राज्य सरकारला एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी परमबीर सिंग यांच्या चौकशी करण्यास नकार दिला आहे.

पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी गृहखात्याला एक पत्र लिहिले आहे. त्यांच्या या पत्रामुळे एकच खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी नुकतेच उच्च न्यायालयात संजय पांडे यांच्या विरोधात याचिका केली आहे. या याचिकेत अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटी वसूली प्रकरणी आरोप मागे घेण्यासाठी संजय पांडे दबाव टाकत असल्याचे आरोप करण्यात आले आहे. त्यानंतर आता संजय पांडे यांनी राज्य सरकारला पत्र लिहून चौकशी करण्यास नकार दिला आहे.

सोन्याचे दर 60000 पार जाण्याची शक्यता, या 5 गोष्टी ठरणार कारणीभूत

परमबीर सिंग यांच्या  याचिकेवर 5 मे रोजी सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच त्यांनी पत्र लिहून परमबीर सिंग यांची चौकशी करण्यात नकार दर्शवला आहे.

मुंबई पोलिसांनी दोनवेळा चौकशीला बोलावले, आता रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव!

विशेष म्हणजे,  पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. पोलीस अधिकारी अनुप डांगे यांनी तक्रार केली होती.  डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर अंडरवर्ल्डसोबत संबंध आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. 2019 मध्ये डांगे यांनी एका पबवर धाड टाकली होती. तेव्हा तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नावाने पब मालकाने डांगे याने धमकी दिली होती.  नंतर डांगे यांना खातेनिहाय चौकशी करुन निलंबित करण्यात आले होते. पुर्ननियुक्ती करण्यासाठी डांगेंकडून परमबीर सिंह यांच्या खास माणसांनी 2 कोटी रुपये मागणी केली होती. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.

Published by: sachin Salve
First published: May 3, 2021, 11:12 AM IST
Tags:

ताज्या बातम्या