'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून !

रविवार, 23 सप्टेंबरला गणपती विसर्जनाच्या वेळी ते स्वत: कार चालवत होते. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं रिक्षाला धडक बसली.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2018 05:18 PM IST

'झिंगाट' कलाकाराचा प्रताप, रिक्षाला धडक मारून चालला होता पळून !

दिवाकर सिंह, प्रतिनिधी

मुंबई, 25 सप्टेंबर : अभिनेता दिलीप ताहील यांनी दारूच्या नशेत आपल्या कारनं एका रिक्षाला धडक दिली. रिक्षात बसलेले दोघं जण जखमी झाले या अपघातानंतर दिलीप ताहिल यांनी पळून जाण्याचा प्रयत्नही केला. पण तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना अटक केली. जामीनावर त्यांची सुटका झालीय.

पोलीस स्टेशनवरचा दिलीप ताहील यांचा फोटो बरंच काही सांगून जातो. त्यांना दारूची नशा इतकी चढलीय की आजूबाजूचं काहीच कळत नाहीय. रविवार, 23 सप्टेंबरला गणपती विसर्जनाच्या वेळी ते स्वत: कार चालवत होते. कारवरचं नियंत्रण सुटल्यानं रिक्षाला धडक बसली. त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण विसर्जनाची गर्दी असल्यानं ते पकडले गेले.

खार इथल्या चायना गार्डन रेस्टाॅरंटसमोर ही घटना घडली. रिक्षात बसलेल्या लोकांच्या पाठीला मार लागला. त्यामुळे त्यांनी केलेल्या तक्रारीवरून दिलीप ताहिल यांना अटक केली. त्यांनी रक्त तपासणी करण्यास नकार दिला.

सिनेमा कलाकारांनी नशेत गाडी चालवणं नवीन नाही. आतापर्यंत अशी बरीच उदाहरणं समोर आलीयत. पडद्यावर सोज्वळ, संस्कारी भूमिका वठवणारे हे कलाकार पडद्यामागे वेगळे असतात.  दिलीप ताहिल यांची बाजीगर, इश्क, राजा अशा अनेक सिनेमांत महत्त्वाची भूमिका होती.

Loading...

VIDEO : कुठून आला रे..?, मनसे सैनिकांचा परप्रांतीय कामगारांना खळ्ळखट्यॅक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 04:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...