दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा बिघडली, लीलावतीमध्ये दाखल

दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा बिघडली, लीलावतीमध्ये दाखल

छातीतल्या संसर्गामुळे त्यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय.

  • Share this:

मुंबई, 5 सप्टेंबर : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना लीलावतीमध्ये दाखल करण्यात आलंय. छातीतल्या संसर्गामुळे त्यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केलंय. त्यांना श्वास घ्यायला त्रास होतोय.

लीलावतीचे डायरेक्टर आॅफ आॅपरेशन्स अजय पांडे म्हणाले, हे त्यांचं रुटिन चेकअप आहे.

काही दिवसांपूर्वी दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी भावनिक ट्विट करत दिलीप साहेबांच्या प्रकृती विषयी प्रार्थना करण्याचं आवाहन त्यांच्या चाहत्यांना केलं होतं. तुम्हा सर्वांवर अल्लाची असीम कृपा राहो. तुम्ही माझ्या ‘कोहिनूर’च्या आरोग्यासाठी आणि ते आनंदी राहावेत यासाठी प्रार्थना करा असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलं.

दिलीप साहेबांची प्रकृती सध्या ठिक आहे. ते घरीच आराम करत आहेत असंही त्यांनी सांगितलं होतं. वृद्धापकाळामुळे दिलीप कुमार यांची प्रकृती अनेकदा ठीक नसते. त्यांना वारंवार उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लगातं त्या पार्श्वभूमीवर सायरा बानो यांच्या या ट्विटकडे पाहिलं जात होतं.

दिलीप साहेबांशिवाय एखाद्या कार्यक्रमात जाणं हे फार क्विचितच होतं अशी वेदनाही त्यांनी ट्विटरवर व्यक्त केली. असिफ फारुखी यांची मुलगी निदा हिच्या लग्नात सायरा बानो या उपस्थिती होत्या. त्यावेळी त्यांना दिलीप साहेबांची उणीव भासली आणि त्यांनंतर एकामागून एक ट्विट करत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मध्यंतरी, किंग खान शाहरुखने नुकतंच बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची भेट घेतली. शाहरुख दिलीप कुमार यांच्या तब्येतीची विचारणा करण्यासाठी त्यांच्या घरी पोहचला होता. एवढंच नव्हे तर शाहरुखने त्यांच्याबरोबर काही वेळ एकत्र घालवला.

Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार

First published: September 5, 2018, 5:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading