'राज्यपालांची मनमानी, त्यांचा आदेश संविधान विरोधी', शिवसेनेच्या याचिकेतील युक्तीवाद
फ्लोर टेस्ट थांबवता येणार नाही : सुप्रीम कोर्ट 13 एप्रिल 2020 रोजी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी, शिवराज सिंह विरुद्ध स्पीकरमध्ये, आमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या कारवाईपर्यंत फ्लोर टेस्टला स्थगिती दिली जाऊ शकत नाही, असे मत मांडले होते. सुप्रीम कोर्टाने असेही स्पष्ट केले होते की राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूचीनुसार आमदारांचे राजीनामे आणि पक्षांतराचा निर्णय अध्यक्षांनी घेतला नसल्याने फ्लोअर टेस्ट थांबवण्याची गरज नाही. या काळात फ्लोर टेस्ट घेण्याची गरजही कोर्टाने स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाकडे बहुमत आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी फ्लोअर टेस्ट घेणे खूप महत्त्वाचे आहे. सरकारच्या अस्तित्वासाठी आणि टिकण्यासाठी ते आवश्यक आहे. ही अशी बाब आहे ज्यामध्ये कोणताही विलंब होऊ शकत नाही, कारण मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकार मंत्रिपरिषदेवर अवलंबून आहे, ज्यावर सभागृहाने विश्वास ठेवला पाहिजे. सेनेचा युक्तीवाद काय? "सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या अर्जात शिवसेनेने असा युक्तिवाद केला आहे की, अधिवेशन बोलवण्याचा राज्यपालांचा आदेश मुख्यमंत्री आणि मंत्रीपरिषद यांच्या शिफारसी आणि सल्ल्याने जारी करण्यात येण्याची गरज आहे. मात्र, येथे राज्यपालांनी त्याचे उल्लंघन करून मनमानी पद्धतीने अधिवेशन बोलविण्याचे आदेश जारी केले आहेत", असं शिवसेनेने याचिकेत म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.