'शिवसेने'वरून नितेश आणि निलेश राणे बंधूंमध्ये मतभेद

'शिवसेने'वरून नितेश आणि निलेश राणे बंधूंमध्ये मतभेद

'ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही.'

  • Share this:

मुंबई 13 ऑक्टोंबर : शिवसेनेबाबत नितेश राणे यांनी घेतलेल्या नव्या भूमिकेवर त्यांचे बंधू आणि माजी खासदार निलेश राणे यांनी विरोधी भूमिका घेतलीय. नितेश यांच्या शिवसेनेच्या भूमिकेबाबत मी जराही सहमत नाही असं निलेश राणे यांनी ट्विट करून सांगितल्याने निवडणुकीत नितेश यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय. आदित्य ठाकेरे यांनी विधीमंडळात येण्याचा निर्णय घेतला हे स्वागतार्ह आहे. मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार असल्याचं नितेश राणे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. नितेश हे कणकवलीमधून भाजपतर्फे निवडणूक लढवत आहेत. मात्र मतदानाला काही दिवस राहिले असतानाच नितेश यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेचा विरोध थोडा कमी होईल असं म्हटलं जातं होतं. मात्र आता त्यांच्या बंधूंनीच त्याला विरोध केल्याने नितेश राणेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी कवीही आहेत, त्यांनी समुद्रावर केलेली 'ही' कविता एकदा ऐकाच

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षाने राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार.

काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे हे कणकवलीतून भाजपचे उमेदवार आहेत. मात्र कणकवलीत शिवसेनेनं बंडखोरी केलीय. अशा परिस्थिती असतानाही कायम आक्रमक असणाऱ्या नितेश राणे यांनी नरमाईची भूमिका स्वीकारलीय. 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आदित्य यांच्यापुढे मैत्रीचा हात पुढे केला. ते म्हणाले, राज्याच्या विकासासाठी आदित्य ठाकरेंसोबत सहकार्य आणि  काम करण्यास तयार आहे. आदित्य यांची विधानसभेच्या पायऱ्यांऱ्यांवर भेट व्हावी अशी माझी इच्छा आहे. त्यांनी घेतलेली भूमिका अतिशय सकारात्मक आहे.

भारत कधीही हिंदू राष्ट्र नव्हतं, नाही आणि असणारही नाही, इंशाअल्लाह- ओवेसी

आदित्य हे कायदे करण्यासाठी, विधानसभेचं कामकाज समजून घेण्यासाठी जर निवडणूक लढवित असतील तर त्यांचं स्वागतच करायला पाहिजे असंही ते म्हणाले. शिवसेनेने कणकवलीत बंडखोरी केलेली असतानाही शिवसेनेवर टीका करणार नाही असं नितेश राणे म्हणाले. शिवसेनेने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. मी त्यावर काहीही टाका करणार नाही असं स्पष्ट करत त्यांनी संघर्ष टाळण्याची भूमिका व्यक्त केली.

भाजपची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात जाणं काहीही गैर नाही. त्यांची विचारसरणी मला समजून घ्यायची आहे असंही ते म्हणाले. संघाची काही पुस्तकं मी विकत घेतली आहेत असंही त्यांनी सांगितलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 13, 2019, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading