Home /News /mumbai /

आशिष शेलारांसोबत गुप्त बैठक झाली का? संजय राऊतांनी केला खुलासा

आशिष शेलारांसोबत गुप्त बैठक झाली का? संजय राऊतांनी केला खुलासा

'मी काल कामात होतो पण कोणीतरी अफवा पसरवली, अशा अफवा पसरल्याने राजकारण हलत का?'

  मुंबई, 04 जुलै : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपचे नेते आशिष शेलार (ashish shelar) यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले. पण, महाराष्ट्रातील दोन मोठे नेते भेटले तर त्यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण काय? पण मुळात अशी भेट झालीच नाही, मी काल कामात होतो पण कोणीतरी अफवा पसरवली, अशा अफवा पसरल्याने राजकारण हलत का? असं म्हणत संजय राऊत यांनी शेलार यांच्या भेटीबद्दल वृत्ताचं खंडन केलं. मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना संजय राऊत यांनी आशिष शेलार यांच्यासोबत गुप्त बैठकीच्या चर्चेला पूर्णविराम दिला. महाराष्ट्रातील दोन मोठे नेते भेटले तर त्यात आश्‍चर्य वाटण्याचे कारण काय? पण मुळात अशी भेट झालीच नाही, मी काल कामात होतो पण कोणीतरी अफवा पसरवली, अशा अफवा पसरल्याने राजकारण हलत का?  अस्थिर होतं का? अजिबात नाही,  उलट अशा अफवा पसरल्याने आमच्या पक्षाचे नेते एकत्र येतात. त्यामुळे असे अफवा पसरवणारे कारखाने एक दिवस दिवाळखोरीत जातील' असं राऊत म्हणाले.

  इरफान खानचा दुबई रिटर्न 15 वर्षानंतर प्रदर्शित; या ठिकाणी घ्या चित्रपटाचा आनंद

  'महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यामुळे तीन पक्षांनी  कृषी कायद्याविरोधात हा ठराव आहे, म्हणजे तीन पक्षांचे एकमत आहे. लवकरच सुधारीत विधेयक दाखल केले जातील, असंही राऊत म्हणाले. 'शिवसेनेचे किंवा सरकारचे अनेक मुद्दे असू शकतात आणि ते राज्याच्या हिताचे असू शकतात. पण त्याच्यावर चर्चा होणे गरजेचे आहे, कायदे होणे गरजेचे आहे, ठराव मंजूर होणे गरजेचे आहे. पण विरोधी पक्षाने विधिमंडळाचे कामकाज पूर्ण वेळ चालू देणे गरजेचे आहे, जर विरोधी पक्ष स्वतःला महाराष्ट्राचे समजत असतील तर त्यांनी दोन दिवस पूर्ण वेळ अधिवेशन चालू द्यावे, असंही राऊत म्हणाले.

  बापरे! दंश करताना विंचू कसं सोडतो विष? पाहा हैराण करणारा VIDEO

  'गोंधळ म्हणजे रणनीती नाही, अधिवेशन चालू न देणे याला रणनीती म्हणणार का, अशी रणनीती की समोरून देखील होऊ शकते, पण दोन दिवसाची अधिवेशन गोंधळात वाहू देणार का? एमपीएससी विद्यार्थ्यांचा विषय लसीकरणाचा विषय, बेरोजगारीचा,  शेतकऱ्यांचा विषय असे अनेक विषय आहेत. यावर चर्चा झाली पाहिजे, असंही राऊत म्हणाले. राजीव साप्ते आत्महत्या प्रकरण दुर्दैवी आहे. यासंदर्भात महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे, या क्षेत्रात काम करतोय त्यामुळे मला माहित आहे तिथे काय चालतंय, असंही राऊत म्हणाले.
  Published by:sachin Salve
  First published:

  Tags: Ashish shelar, Sanjay raut, Shivsena

  पुढील बातम्या