Home /News /mumbai /

नाराज आमदारांबद्दल उद्धव ठाकरेंना माहिती होती का? एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा

नाराज आमदारांबद्दल उद्धव ठाकरेंना माहिती होती का? एकनाथ शिंदेंनी केला मोठा खुलासा

'मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.

'मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.

'मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे.

    मुंबई, २२ जून: शिवसेनेवर (shivsena) मोठे संकट उभा ठाकले आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी पुकारलेले बंड आहे. एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सरकार स्थापन करणार अशी चर्चा रंगली आहे.पण, एकनाथ शिंदे यांनी हे चर्चा फेटाळून लावली आहे. एकनाथ शिंदे यांनी न्यूज१८ लोकमतशी बोलत असताना आपली भूमिका मांडली. 'आम्ही शिवसेनेचे सदस्य मिळून एकूण ४६ आमदार एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. त्यांची दिलेले हिंदुत्व पुढे नेणार आहोत. आमच्यासोबत ६ अपक्ष आमदार आहे आणि इतर सेनेचे आमदार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही सुरू आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे' असं शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे आजच बंड का करावे वाटले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाराज आमदारांबद्दल सांगितले नाही का, असं विचारला असता शिंदे म्हणाले की, 'अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांची नाराजी कळवली होती.त्यांनी आपण यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं' 'मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो आमदारांशी चर्चा करून घेणार आहे. भाजपसोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो आमदारांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहे'असं शिंदे म्हणाले. दरम्यान,शिंदे यांनी बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं बंडखोर आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज संध्याकाळी (बुधवार) वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याचा आदेश पक्षानं या आमदारांना दिला आहे. या बैठकीची सूचना विधानसभेत नोंदणी केलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवली आहे.त्याशिवाय सोशल मीडिया, व्हॉट्सअप आणि एसएमएसद्वारेही आमदारांना कळवण्यात आले आहे.या बैठकीस लिखित स्वरूपात वैध आणि पुरेशी कारणे दिल्याशिवाय गैरहजर राहता येणार नाही, असा इशारा पक्षानं दिला आहे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास शिवसेना सदस्यत्व सोडण्याचा तुमचा इरादा आहे, असं मानले जाईल असा इशारा शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आला आहे. शिवसेना विधिमंडळ पक्षाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी हे पत्रक काढले आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या