मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली का? फडणवीसांनी दिलं उत्तर

पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली का? फडणवीसांनी दिलं उत्तर

'मोदींचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या भेटी होत होत्या, असे संबंध असले पाहिजे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल'

'मोदींचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या भेटी होत होत्या, असे संबंध असले पाहिजे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल'

'मोदींचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या भेटी होत होत्या, असे संबंध असले पाहिजे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 08 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackery) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra modi) यांची भेट घेतली ही चांगली गोष्ट आहे, केंद्रात आणि राज्यामध्ये संवाद असला पाहिजे, असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्वागत केलं. तसंच, पंतप्रधानांसोबत भेटीदरम्यान व्यक्तिगत भेट होत असते, असा खुलासाही फडणवीसांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok chavan) यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि मराठा आरक्षणासह 12 मुद्दे मांडले. या भेटीवर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.

APY Scheme: दररोज 7 रुपयांच्या गुंतवणुकीवर दर महिन्याला होईल 5 हजारांची सेव्हिंग

'मला आनंद आहे की किमान त्यांनी केंद्र सरकार बरोबर संवाद केला त्याचे आम्ही स्वागत करतो. 11 विषय मांडल्याचे त्यांनी सांगितले. त्यातले ८-९ विषय हे राज्याचे आहे पण तरी त्यांनी मांडले. Obc आरक्षण केवळ आपल्या राज्यात नाहीसे झाले आहे. १५ महिने काहीच न केल्यामुळे झाले आहे. आताही राज्याने पावलं उचलली तर ते मिळणे शक्य आहे', असं फडणवीस म्हणाले.

'भेट घेतली हे ठीक आहे. दरवेळी केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यापेक्षा भेट घेतली ते बरं झालं पण जे मुद्दे राज्याचे आहे. त्यावर भेट घेण्यापेक्षा केंद्राच्या मुद्यावर भेट घेतली तर बरं होईल. मला वाटतं ही पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांची व्यक्तिगत भेट झाली असेल तर चांगले गोष्ट आहे. अशी बैठक होत असते. ती झाली की नाही मला माहिती नाही. पण झाली असेल तर चांगले आहे. कारण, पंतप्रधान मोदींकडे गेल्यावर राज्याच्या मुख्यंत्र्यांसोबत एक व्यक्तिगत बैठक होत असते, मी सुद्धा मुख्यमंत्री असताना दिल्लीला जात होतो, तेव्हा अशी बैठक होत होती, त्यांची झाली की नाही हे मला माहित नाही, असंही फडणवीस म्हणाले.

ट मोदींचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे चांगले संबंध होते. त्यांच्या भेटी होत होत्या, असे संबंध असले पाहिजे. त्याचा महाराष्ट्राला फायदा होईल. राजकारणात जर तरला र्थ नसतो. ते सत्तेत आहेत आम्ही विरोधात आहोत, हेच सध्या सत्य आहे, असंही फडणवीस म्हणाले.

'मराठा आरक्षण बाबत समितीने सांगितले आहे. की मर्यादित पद्धतीने ही रिव्ह्यू पीटिशन टाकावी लगेल. या विषयातही जोवर राज्य सरकार कृती करत नाही तोवर केंद्र सरकार काही करू शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

मेट्रो कारशेड हा आमच्यासाठी काही प्रतिष्ठेचा विषय नाही. पण, आरे कारशेडमध्ये मेट्रोचे काम 25 टक्के पूर्ण झाले आहे. जर काम सुरू केले तर 9 महिन्यात पूर्ण होईल. तेच काम कांजूरमार्गच्या जागेवर केले तर त्याचा खर्च आणखी वाढणार आहे, तसंच वेळ सुद्धा 4 वर्ष लागणार आहे. पण, मेट्रो लवकर व्हावी अशी आमची सुद्धा मागणी आहे, असंही फडणवीस म्हणाले.

First published: