मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दिल्लीत फडणवीस आणि शरद पवारांची खरंच भेट झाली का? राष्ट्रवादीने केला खुलासा

दिल्लीत फडणवीस आणि शरद पवारांची खरंच भेट झाली का? राष्ट्रवादीने केला खुलासा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेटही पूर्वनियोजित होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेटही पूर्वनियोजित होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेटही पूर्वनियोजित होती.

नवी दिल्ली, 17 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीमुळे राज्यात राजकीय चर्चांना उधाण आहे. त्यातच भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाल्याची बातमी समोर आली. पण, ही निव्वळ अफवा होती,  फडणवीस आणि शरद पवार यांच्यात कुठेही बैठक झाली नाही' असा खुलासा राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (navab malik) यांनी केला.

पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीबद्दल माहिती देण्यासाठी नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची भेटही पूर्वनियोजित होती.  पियुष गोयल राज्यसभा नेते झाले त्यांनी पवार यांची भेट झाली. हा एक शिष्याचाराचा भाग आहे. संरक्षणमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पवार यांच्यासोबत ए के अँटनी पण होते, सीमेवर ज्या घडामोडी घडत आहेत त्यावर चर्चा झाली, असं मलिक यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आहे. त्यामुळे काही जणांनी पवार आणि फडणवीस भेट झाल्याची माहिती पसरवली. पण अशी कोणतीही भेट झाली नाही. ही निव्वळ अफवा आहे, असंही मलिक म्हणाले.

VIDEO : Journalist Danish Siddiqui च्या मृत्यूनंतर तालिबानींनी जारी केलं वक्तव्य

आज पंतप्रधान यांच्या सोबत ठरलेली बैठक होती. सहकारी बँक अधिनियम बदलण्यात येत आहेत त्यावर चर्चा झाली. आरबीआयला एवढे अधिकार कसे ? नव्या नियमानुसार कोणीही शेअर होल्डर शेअर विक्री करू शकतात. या नियमामुळे अनेक मोठे उद्योजक यात येतील सहकार मोडीत निघेल. त्यामुळे शरद पवार यांनी  पंतप्रधान मोदींना यांना लिहिले होते. याबद्दलच ही भेट घेतली, असंही मलिक म्हणाले.

'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी सांगितलं की, कोरोनावर मात करण्यासाठी राष्ट्रीय धोरण बनवावे, हा विषय अत्यावश्यक असून यावर पंतप्रधान यांनी विचार करावा याविषयी देखील बैठकीत चर्चा झाली, असंही मलिक म्हणाले.

परश्याचं डार्लिंगसोबत PHOTOSHOOT, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

तर, सोलापूर दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीबाबत पत्रकारांनी विचारले. यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, 'देशातील ज्या नागरी अर्बन आणि सहकारी बँका आहेत त्या बँकांवर काही निर्बंध रिझर्व्ह बँकेने आणले आहेत.या निर्बंधामुळे देशात ज्या सहकारी क्षेत्रातील बँका आहेत त्या बँकांचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक आणि त्यावर आणखी एक मंडळ जे त्यांना मार्गदर्शन आणि सल्ले देईल अशी एक वेगळी रचना आरबीआयने केली आहे. पूर्वी नाबार्डचं बंधन या सर्व बँकांवर होतं. नाबार्डचं बंधन काढून केंद्राने आरबीआयचं बंधन घातलं आहे. देशात राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका नागरिकांना दाद देत नाहीत त्यामुळे महाराष्ट्र, गुजरातमध्ये सहकार क्षेत्र भक्कमपणे उभं राहिलं. बँकांना आता निर्बंधांत आणण्यात आले आहे आणि हे निर्बंध कमी करण्याच्या आग्रही मागणीसाठी शरद पवार हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आहेत.'

First published:
top videos

    Tags: Delhi, Maharashtra, Narendra modi, Nawab malik, NCP, Sharad pawar