S M L

धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना सुधारित मोबदला दिला जाईल,उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन

'सुधारित मोबदला त्यांना लगेच दिला जाईल. मी जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्मूल्यांकन करून अहवाल देण्याचे आदेश दिलेत. हा अहवाल उद्यापर्यंत येईल. नियमानुसार मोबदला दिला जाईल, ' अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीये.

Sonali Deshpande | Updated On: Jan 29, 2018 11:27 AM IST

धर्मा पाटलांच्या कुटुंबीयांना सुधारित मोबदला दिला जाईल,उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन

29 जानेवारी : मंत्रालयात विष प्राशन केल्यामुळे शेतकरी धर्मा पाटील यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना आज सरकार आश्वस्त करण्याचा प्रयत्न करतंय. प्रकल्पासाठी जमीन गेल्यावर इतरांपेक्षा मोबदला कमी मिळाला, अशी कुटुंबीयांची तक्रार आहे. 'सुधारित मोबदला त्यांना लगेच दिला जाईल. मी जिल्हाधिकाऱ्यांना पुनर्मूल्यांकन करून अहवाल देण्याचे आदेश दिलेत. हा अहवाल उद्यापर्यंत येईल. नियमानुसार मोबदला दिला जाईल, ' अशी माहिती उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीये.

धुळे जिल्ह्यातल्या विखरण या गावचे ते होते. संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, या मागणीसाठी धर्मा पाटील यांनी विष प्राशन केलं होतं. त्यांच्यावर मुंबईतल्या जे.जे. रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या उपचारास यश आलं नाही आणि त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 29, 2018 11:27 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close