मुंबई, 20 एप्रिल : राज्यातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या 4400 च्या पार गेली असून मुंबई, पुणे, ठाणे हे जिल्हे राज्यातील हॉटस्पॉट असल्याचे सांगितले जात आहे. त्यातही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत (Dharavi) कोरोना शिरल्यानंतर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. आज केवळ धारावीत कोरोनाचे (Covid -19) 30 नवे रुग्ण सापडले असून आता केवळ धारावीत कोरोनाबाधितांचा आकडा 168 वर पोहोचला आहे.
येथे आज एकही मृत्यू झाला नसल्याची चांगलीही बाब आहे. धारावीतील शास्त्रीनगर येथील सर्वाधिक रुग्ण आहेत. धारावीतील 11 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दादरमध्ये 3 नवे रुग्ण दाखल करण्यात आले असून आता दादर येथील रुग्णांची संख्या 25 पर्यंत पोहोचली आहे. आज बाधित रुग्णांमध्ये 24 वर्षीय महिला तर दोन पुरुषांचा समावेश आहे. 25 रुग्णांमध्ये सगळ्यात जास्त रुग्ण हे शुश्रूषा रुग्णालयात काम करणारे आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून आतापर्यंत 17658 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशात आतापर्यंत 559 जणांचा मृत्यू झाला असून गेल्या 24 तासांत 1540 नवी प्रकरणं समोर आली आहे. याशिवाय गेल्या 24 तासांत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी जेव्हा धारावीत पहिला रुग्ण आढळल्याने पालिकेकडून योग्य ती कारवाई करण्यात आली होती. मात्र धारावी या भागात लोक दाटीवाटीने राहतात. लहान लहान घरांमध्ये लोक राहत असल्याने तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अवघड जाते. त्यामुळे धारावीत कोरोनाबाधित आढळल्याने हा व्हायरस झपाट्याने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र असे असले तरी नागरिकांनी योग्य ती काळजी घेतल्यावर यावर नियंत्रण आणणे शक्य आहे.
संबंधित - बाजारात एका व्यक्तीचा झाला मृत्यू, सफाई कर्मचाऱ्याने सायकलने शव रुग्णालयात नेलंलॉकडाऊनमध्ये गरजुंच्या मदतीसाठी धावला हा अभिनेता, आता आर्थिक संकटाचा करतोय सामना
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.