मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दुसरी लाट आटोक्यात?, जाणून घ्या

हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत दुसरी लाट आटोक्यात?, जाणून घ्या

Dharavi Records: मुंबईतून एक चांगली बातमी समोर येत आहे. एकेकाळी कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र आहे.

Dharavi Records: मुंबईतून एक चांगली बातमी समोर येत आहे. एकेकाळी कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र आहे.

Dharavi Records: मुंबईतून एक चांगली बातमी समोर येत आहे. एकेकाळी कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र आहे.

मुंबई, 07 जून: आजपासून महाराष्ट्रात अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आटोक्यात येत असल्यानं राज्य सरकारनं अनलॉक जाहीर केला. अशातच मुंबईतून एक चांगली बातमी समोर येत आहे. एकेकाळी कोरोनाच्या पहिल्या लाटेत हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोना आटोक्यात आल्याचं चित्र आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी झोपडपट्टी (slum) असलेल्या धारावीत (Dharavi) रविवारी केवळ दोन (active cases) कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळून आले.

मुंबई महानगरपालिकेनं (Brihanmumbai Municipal Corporation ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, धारावीत एकूण 6, 835 रुग्णांची नोंद असून 6,456 रुग्ण बरे झालेत. दरम्यान धारावीत शनिवारी अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 22 होती जी रविवारी 20 झाली आहे.

हेही वाचा- ''कोविडला आमंत्रण देणारी गर्दी चालणार नाही''- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तर दादरमध्ये रविवारी 8 नव्या कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. दादरमध्ये कोरोनाची रुग्णांची एकूण संख्या 9 हजार 487 वर पोहोचली आहे. माहिममध्ये गेल्या 24 तासात नवीन 12 रुग्ण आढळून आले. तर 201 अॅक्टिव्ह रुग्ण असून माहिममध्ये आतापर्यंत 9423 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. माहिममध्ये एकूण रुग्णांचा आकडा 9826 इतका आहे.

हेही वाचा- Breaking News: पाकिस्तानमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, 30 जणांचा मृत्यू

मुंबई महानगरपालिका (बीएमसी) चा जी उत्तर विभागात म्हणजेच धारावी, दादर, माहिम या भागात रविवारी 22 नवे रुग्ण आढळले. जी उत्तर विभागातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 26 हजार 148 वर पोहोचला आहे. या भागात सध्या 374 अॅक्टिव्ह रुग्ण असून 25 हजार 29 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Dharavi, Mumbai