मुंबई, 16 मार्च : कोरोनावर (Corona) मात करण्यासाठी मुंबईतील (Mumbai) धारावी पॅटर्नचं (Dharavi) जगभरात कौतुक झालं. अनेक ठिकाणी हा पॅटर्न वापरला गेला आणि त्याची उपयुक्तता ही लक्षात आली असली तरी मागचे दोन महिने हा पॅटर्न धारावीत वापरला जात नव्हता. पण आता मात्र हळूहळू वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या पाहता धारावी पॅटर्न पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेने लागू केला आहे.
याअंतर्गत धारावीतील जिथे जिथे रुग्ण सापडतील तिथे तिथे त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची सरसकट आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. धारावीत चाचणीसाठी अतिरिक्त कॅम्प सुरू केले गेले आहे, जे मागचे दोन महिने बंद होते. सोमवारपासून धारावी, दादर आणि माहीम या भागांसाठी म्हणजेच जी उत्तर या प्रभागासाठी 20 चाचण्या केंद्र सुरू केले गेले पैकी 9 केंद्र एकट्या धारावीसाठी उभारण्यात आलेत.
On This Day : सचिनने घडवला इतिहास, 'हा' पराक्रम करणारा एकमेव क्रिकेटपटू
धारावीत 56 हजार कुटुंब राहतात. कोरोना संसर्गाच्या काळात काही कुटुंब आणि स्थलांतरित मजूर आपापल्या गावी गेले होते. पण जे आता धारावीत परतले आहेत. जी उत्तर प्रभागाचे किरण दिघावकर म्हणतात की, '1 फेब्रुवारीपासून आम्ही चाचण्या वाढवल्या असल्या तरी आता रुग्ण वाढीचा दर पाहता आम्ही बंद केलेले कॅम्प आता पुन्हा सुरू करतोय. मागच्या 23 महिन्यात आम्ही फक्त पालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात या चाचण्या करत होतो पण आता मात्र अधिकच्या चाचण्या करण्याची गरज वाढतेय. आपल्याकडे पुरेशा चाचण्या होतील इतकी व्यवस्था आहे.'
जी उत्तर प्रभागाचे मेडिकल हेल्थ ऑफिसर डॉ.विरेंद्र मोहिते यांनी म्हटल्याप्रमाणे ' आम्ही एक रुग्ण सापडला तर अख्खी गल्ली किंवा मग घराच्या मागे पुढे 25-25 घरातील रहिवाशीयांची आम्ही चाचणी करतो. कारण, साधारण 500 रहिवाशीयांसाठी 1 टॉयलेट अशी सुविधा असते. त्यामुळे आम्हाला खबरदारी घेणं गरजेचं आहे. अजून मोठाले कंटेन्मेंट झोन असे तयार नाहीत.'
मुंबईच्या रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार, इनोव्हा गाडी पूर्णपणे जळून खाक
धारावीत सध्या 208 सक्रिय रुग्ण आहेत आणि यातील एकतर रुग्णालयात भरती आहेत किंवा पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. कारण, इथली लोकसंख्येची घनता आणि सार्वजनिक शौचालय हे पाहता इथे कुणालाही विलगीकरणात घरीच ठेवलं तरी त्याचा फायदा होत नाही. म्हणून इथल्या प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला अगदी लक्षणं दिसत नसतील, प्रकृती स्थिर असेल तरीही त्यांना विलगीकरण कक्षात राहावं लागतं.
सहाय्यक आयुक्त दिघावकार यांनी सांगितले की, ' इथे राहणाऱ्या लाखो लोकांच्यात जेव्हा 14-15 रुग्ण बाधित येतात त्यापैकी आता विखुरलेल्या घरात असतात. एकाच ठिकाणी नाही. अशात विलगीकरणात राहणारा रुग्ण घरीच आहे की नाही? तो बाहेर गेला नाही ना? यावर लक्ष ठेवणं कठीण जातं जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा हे सोप होतं. आता मात्र ते शक्य नाही'.
सध्या जी उत्तर या प्रभागात सर्वाधिक रुग्ण हे माहीममध्ये आढळत आहेत. पण पालिकेचा पूर्ण लक्ष पुनः एकदा धारावीवर केंद्रीत झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dharavi, Maharashtra, Mumbai, धारावी, मुंबई