मुंबई, 19 जानेवारी : राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांच्यावर रेणू शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. अशा परिस्थितीत मात्र बीडकरांनी धनंजय मुंडेंना साथ देत परळी ग्रामपंचायत निवडणुकीत ( Gram Panchayat election) राष्ट्रवादीला दणदणीत विजय मिळवून दिला. बीडकरांच्या या प्रेमामुळे धनंजय मुंडे भारावून गेले.
परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाला आहे. तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींमध्ये मतदान झाले. त्यापैकी 10 ठिकाणी पंकजा मुंडे आणि भाजपच्या गटाला धक्का देत राष्ट्रवादीने विजय मिळवला आहे.
या विजयाबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून बीडकरांचे आभार मानले आहे.
परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. @NCPspeaks समर्थक उमेदवारांचा विजय झाला आहे, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन ! गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा ! खूप खूप शुभेच्छा !! pic.twitter.com/cJGbJMOEQX
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 18, 2021
'परळी विधानसभा मतदारसंघात ग्रामपंचायत निवडणूका झालेल्या 12 पैकी 10 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. समर्थक उमेदवारांचा विजय झाला आहे, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. गावाच्या विकासासाठी एकदिलाने काम करा, खूप खूप शुभेच्छा' अशी भावना धनंजय मुंडेंनी व्यक्त केली.
धनंजय मुंडेंसाठी तब्बल 2 किलोमीटर दंडवत घालून केली नवसपूर्ती!
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या पाठीमागचे शुल्ककाष्ठ दुर होण्यासाठी नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी प्रभू वैद्यनाथ चरणी नवस बोलून प्रार्थना केली होती. त्यांची प्रार्थना प्रभू वैद्यांनाथाने पूर्ण केली. त्याची नवसपूर्ती म्हणून आज संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिर ते प्रभू वैद्यनाथ मंदिर असा पूर्ण दंडवत घालन्यास गोपाळ आंधळे या नगरसेवकाने सुरुवात केली आहे. तर धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक असलेले प्रदीप कळंबे यांनी गुडघ्यावर दंडवत घातला आहे. ढोल ताशे यांच्या गजरात हा कार्यक्रम सुरू करण्यात आला या वेळी पंचक्रोशीतील तमाम मुंडे प्रेमी उपस्थित होते.
धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने अतिशय हेतुपुरस्सर बदनामीचे षडयंत्र रचले होते. या संकटातून धनंजय मुंडे दोषमुक्त व्हावेत म्हणून नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी प्रभू वैद्यनाथास दंडवत घालणार असा नवस केला होता.
संत श्रेष्ठ सावता महाराज मंदिर येथून दंडवत सुरू करून राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक, नेहरू चौक, संत जगमित्रनागा महाराज मंदिर ते प्रभू वैद्यनाथ मंदिर असा तब्बल 2 किलोमीटर पुर्ण दंडवत घालून नवसपूर्ती करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gram panchayat, बीड