धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी

19 आमदारांच्या निलंबनावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक दिसले.विधान परिषदेत धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खडाजंगी झाली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Mar 29, 2017 07:52 PM IST

धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जोरदार खडाजंगी

29 मार्च : तीन दिवसांच्या सुट्टीनंतर आज अधिवेशन सुरू झालं.मात्र कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेतील विरोधक संघर्ष यात्रेला गेल्यामुळे तिथे शुकशुकाट दिसून आला.पण 19 आमदारांच्या निलंबनावरून विधान परिषदेत विरोधक आक्रमक दिसले.विधान परिषदेत धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये खडाजंगी झाली.

धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांवर कडाडून हल्ला चढवला. ते म्हणाले, 'विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीची मागणी केली. ती मागणी वैयक्तिक नव्हती.'

त्यावर मुख्यमंत्र्यांनी म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोसावतो, असं म्हटलं. ' हे सभागृह टाळ कुटण्यासाठी नाही, चर्चा करण्यासाठी आहे.' असंही ते म्हणाले.

दोघांची खडाजंगी चांगलीच गाजली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 29, 2017 07:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...