हे तर माझे कर्तव्य, स्नेहाच्या पत्रामुळे धनंजय मुंडे झाले भावुक

हे तर माझे कर्तव्य, स्नेहाच्या पत्रामुळे धनंजय मुंडे झाले भावुक

याबद्दल तिने धनंजय मुंडे यांच्याकडे विद्यापीठाच्या शिषवृत्तीबद्दल मदत मागितली होती. धनंजय मुंडे यांनी तातडीने यात लक्ष घातले आणि....

  • Share this:

मुंबई, 31 डिसेंबर : राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे  (Dhanjay Munde) आपल्या विभागात धडाकेबाज निर्णयामुळे कायम चर्चेत असतात. विद्यार्थ्यांच्या शिषवृत्तीचा विषय असो अथवा वसतीगृहांचा प्रश्न, धनंजय मुंडे यांनी सर्व तात्काळ विषय मार्गी लावले आहे. आताही एका विद्यार्थिंनीला शिषवृत्तीसाठी केलेल्या मदतीमुळे धनंजय मुंडे यांचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

स्नेहा काशीनाथ गोडेश्वर या विद्यार्थिनीने धनंजय मुंडे यांना एक पत्र लिहिले आहे.  स्नेहाने 2020-21 या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठासाठी अर्ज केला होता.

पण, काही तांत्रिक अडचणीमुळे स्नेहाचा अर्ज हा रद्द करण्यात आला होता. त्यानंतर स्नेहाने  ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठात अर्ज केला होता. अचानक विद्यापीठ बदलण्यात आल्यामुळे स्नेहाला अडचणींना सामोरं जावं लागलं होतं.

याबद्दल तिने धनंजय मुंडे यांच्याकडे विद्यापीठाच्या शिषवृत्तीबद्दल मदत मागितली होती. धनंजय मुंडे यांनी तातडीने यात लक्ष घातले आणि स्नेहाच्या आंतरराष्ट्रीय शिषवृत्तीचा विषय मार्गी लावला. त्यामुळे स्नेहाला ऑस्ट्रेलियात शिक्षण घेण्याचा मार्ग पुन्हा एकदा मोकळा झाला आहे.

याबद्दल स्नेहाने धनंजय मुंडे यांना एक पत्र लिहिले आहे. हे पत्र तिने ट्वीट केले आहे. धनंजय मुंडे यांनीही मोठ्या मनाने स्नेहाचे पत्र रिट्वीट केले आहे.  'हे तर माझे कर्तव्य आहे, मी माझ्या सर्व बहिणीच्या पाठीशी आहे, जय हिंद, जय महाराष्ट्र', असंही मुंडे म्हणाले.

Published by: sachin Salve
First published: December 31, 2020, 7:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading