मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

शरद पवारांच्या 'गंभीर' वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

शरद पवारांच्या 'गंभीर' वक्तव्यानंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 14 जानेवारी : धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आदरणीय पवार साहेब आणि पक्ष जे ठरवेल ते, असं धनंजय मुंडे म्हणाले. धनंजय मुंडे हे जनता दरबारासाठी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आले आहेत. जनता दरबार संपल्यानंतर ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतील. काय म्हणाले शरद पवार? धनंजय मुंडे यांच्यावरचे आरोप गंभीर आहेत, असं शरद पवार म्हणाले आहेत. धनंजय मुंडे यांनी माझी भेट घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. मुंडे यांनीही या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे, धनंजय मुंडे यांनी मला दिलेली माहिती मी पक्षासमोर मांडेन, संघटनेच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन आणि चर्चा करून लवकरच याबाबत निर्णय घेऊ, असंही शरद पवार म्हणाले आहेत. धनंजय मुंडेंवर काय आहेत आरोप? धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबध असून यातून आपल्याला दोन मुलं झाली आहेत, याची कबुली दिली, तसंच त्यांच्यावर बलात्काराचा आरोपही करण्यात आला आहे. निवडणुकीसाठी भरलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी या दोन मुलांचा उल्लेख केलेला नाही, त्यामुळे त्यांच्यावर माहिती लपवल्याचाही आरोप आहे.
First published:

पुढील बातम्या