Dhananjay Munde: "5 कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन" मंत्री धनंजय मुंडेंना धमकावत खंडणी मागणारी महिला कोण?
Dhananjay Munde: "5 कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन" मंत्री धनंजय मुंडेंना धमकावत खंडणी मागणारी महिला कोण?
Dhananjay Munde: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेने धमकावत 5 कोटींची खंडणी मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुंबई, 21 एप्रिल : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना एका महिलेने धमकावत 5 कोटी रुपयांची खंडणी (extortion) मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबईतील मलबार हिल पोलीस ठाण्यात (Malabar hill police station Mumbai) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर बलात्काराची तक्रार दाखल करेन अशी धमकी या महिलेने दिली आहे. या महिलेने आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन धनंजय मुंडे यांना फोन करुन धमकी दिली.
वाचा : कोल्हापूर पोटनिवडणुकीत करुणा धनंजय मुंडेंना किती मते मिळाली माहितीये का? वाचा
वारंवार या महिलेकडून फोन कॉल येऊ लागले, त्यासोबतच या महिलेने मंत्री धनंजय मुंडे यांना धमकावत म्हटलं की, 5 कोटी आणि महागडा मोबाइल दिला नाही तर सोशल मीडियात बदनामी सुद्धा करेन. यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी या महिलेच्या विरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित महिलेच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांना आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन फोन केले होते. यावेळी या महिलेने धनंजय मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपये आणि महागडा मोबाइल फोन देण्याची मागणी केली होती.
वाचा : राज ठाकरेंना धमकीचा फोन, मनसे अध्यक्षांच्या जीवाला धोका असल्याचा दावा
या प्रकरणात आता मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित महिला ही धनंजय मुंडे यांच्या परिचयाची असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी हे प्रकरण क्राईम ब्राँचकडे सोपवली असून आता या चौकशीत काय समोर येतं हे पहावं लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.