'पुण्यात 12 लोकांचा जीव गेला आणि मुख्यमंत्र्यांना चिंता आहे फक्त निवडणुकीची'

'पश्चिम महाराष्ट्राच्या पुरपरिस्थितीही मुख्यमंत्र्यांनी हेच केले होते. मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का?'

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 07:41 PM IST

'पुण्यात 12 लोकांचा जीव गेला आणि मुख्यमंत्र्यांना चिंता आहे फक्त निवडणुकीची'

मुंबई 26 सप्टेंबर : पुणे जिल्ह्यात झालेल्या प्रचंड पावसाने हाहाकार उडालाय. 12 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला. तर सर्व जिल्ह्यातला मृतांचा आकडा 17च्याही वर जाण्याची भीती व्यक्त केली जातेय. असं असताना मदतकार्यात सहभागी न होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे दिल्लीत निवडणुकीवर चर्चा करत आहेत. त्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही. त्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत अशी टीका विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलीय. ट्विटरवरून त्यांनी राज्य सरकारवर हे कोरडे ओढले आहेत. भाजपच्या कोअर कमेटीची बैठक दिल्लीत झाली त्या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी ही टीका केलीय.

काय म्हणाले मुंडे ट्विटमध्ये?

राज्यातील जनतेने या सरकारचे काय घोडे मारले आहे हे यांनी एकदा सांगावे. पुण्यात प्रचंड पाऊस झाल्याने पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. 11 लोकांचा मृत्यू झालाय व मुख्यमंत्री दिल्लीत बसलेत. पश्चिम महाराष्ट्राच्या पुरपरिस्थितीही मुख्यमंत्र्यांनी हेच केले होते. मुख्यमंत्र्यांना राज्यातील जनतेबाबत कळवळा नाही का? मुख्यमंत्र्यांना फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत का?

पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती आली होती तेव्हाही लोकांच्या मदतीला सरकारकडून कुणीही धावून गेले नव्हते अशी टीकाही त्यांनी केलीय.

साताऱ्यातून

Loading...

उदयनराजेंना शह देण्यासाठी शरद पवार स्वतः उतरणार रिंगणात?

भाजपच्या 112 उमेदवारांची यादी निश्चित होणार?

भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमेटीची  बैठक आज संध्याकाळी दिल्लीत झाली. दिल्लीतल्या भाजपच्या मुख्यालयात ही बैठक झाली. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतेय. दुपारी 1 वाजता सुरू झालेली ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,  कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, बी. एल. संतोष, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, मंगल प्रभात लोढा, व्ही. सतीश, राज्य संघटक विजय पुराणिक, आदी नेते उपस्थित आहेत. आजच्या बैठकीमध्ये जवळपास 112 उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीनंतर निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या निवासस्थानी पुन्हा एक बैठक होणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.

पंकजा मुंडेंसमोर पेच.. भाजपच्या बालेकिल्ल्यात 'या' जागेवर घटक पक्षांची रस्सीखेच

भाजपच्या नावांवर चर्चा करण्याबरोबरच 'युती'च्या जागावाटपाच्या चर्चेच्या प्रगतीबाबतही या बैठकीत चर्चा झाली झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. युतीची चर्चा आता अंतिम टप्प्यात असून शेवटच्या काही जागांवर शिवसेनेसोबत वाटाघाटी सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात या वाटाघाटी सुरू आहेत आणि लवकरच तोडगा निघण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...