मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मोठा भाऊ म्हणून...,पंकजांसाठी धनंजय मुंडेंचं भावनिक ट्वीट

मोठा भाऊ म्हणून...,पंकजांसाठी धनंजय मुंडेंचं भावनिक ट्वीट

'चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी सातत्याने मागणी आहे की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे'

'चिक्की घोटाळा निघाल्यापासून माझी सातत्याने मागणी आहे की, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, गुन्हे दाखल केले पाहिजे'

'ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केला आहे. यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे'

मुंबई, 29 एप्रिल: भाजपच्या नेत्या आणि माजी महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंकजा यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळताच राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhanjay Munde) यांनी 'मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच' असं भावनिक ट्वीट केलं आहे.

धनंजय मुंडे यांनी ट्वीट करून पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.  'ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केला आहे. यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या, ताई' अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.

आज सकाळी पंकजा मुंडे यांनी ट्वीट करून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. माझ्या कोरोनाच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेल्या लोकांनी खबरदारी घ्यावी आणि कोरोनाची चाचणी करून घ्यावी, असं आवाहनही पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Corona काळात हेल्थ इन्शुरन्स अत्यंत आवश्यक! कशी कराल योग्य विम्याची निवड?

याधीही डिसेंबर महिन्यात पंकजा मुंडे यांची प्रकृती खालावली होती.  'सर्दी खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे त्यांनी isolate होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा तब्येत खालावल्यामुळे कोरोनाची चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

प्रीतम मुंडे सुद्धा होमक्वारंटाइन

चार दिवसांपूर्वी बीडच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांनाही कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यामुळे होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतलाय. 'बीड शहरात कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. प्रत्येक कोविड सेंटरला भेटी दिल्या, डॉक्टर आणि रुग्णांची चर्चा केली. आवश्यक त्या सूचना  देण्यात आल्या आहेत. योग्य ते काम करण्यास भाग पाडले आहे.  हे काम करून मी 18 तारखेला मुंबईत परतले. असताना अचानक माझी प्रकृती बिघडली आहे. 2 ते 3 दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि प्रचंड अशक्तपणा अशी लक्षणं जाणवायला लागला आहे. आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे, पण रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे, अशी माहिती प्रीतम मुंडे यांनी दिली होती.

First published:

Tags: Dhananjay munde, Maharashtra, Mumbai, NCP, Pankaja munde