मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने धनंजय झाले भावुक, म्हणाले...

गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने धनंजय झाले भावुक, म्हणाले...

'अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत...

'अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत...

'अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत...

मुंबई, 03 जून : भाजपचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे (, gopinath munde death anniversary) यांची आज पुण्यतिथी आहे. देशासह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन करत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा देत भावुक झाले आहे.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत आठवणींना उजाळा देत आदरांजली व्यक्त केली आहे.

'अप्पा, ऊसतोड बांधवांच्या कल्याणासाठी तुम्ही आयुष्यभर कष्ट केले. लोकसेवेचा तुमचा हा वसा आणि वारसा पुढे नेत असताना तुमच्याच नावाने ऊसतोड मजूर बांधवांसाठी महामंडळ सुरू केले आहे. मजूर बांधव आणि सर्व समाजासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आयुष्य वेचेन. हा शब्द देतो' अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी दिली.

तसंच, 'आज तुम्ही नाहीत परंतु, तुमचे कार्य आणि विचार सदैव प्रेरणा देत आहेत. असं म्हणत कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन केले आहे.

दरम्यान, लोकनेते स्व गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी यावर्षी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने साजरी होत आहे. कोणताही जाहीर कार्यक्रम होणार नाही. स्व लोकनेत्याने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांच्या स्मरणार्थ काढलेल्या पोस्टल इन्व्हलपचे (लिफाफा) लोकार्पण आज होणार आहे. भारत सरकारच्या डाक विभागाने त्यांचे पोस्टल इन्व्हलप (लिफाफा) काढले असून त्याचे ऑनलाईन विमोचन दुपारी 1 वाजात होणार आहे. नवी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते व केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद, राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत विमोचन होणार आहे.  दिल्ली व गोपीनाथ गडावरून एकाच वेळी हा कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, अशी माहिती भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली.

राज्यांना सतत पाण्यात पाहणे हा जुलूम नाही तर काय? सेनेचा मोदी सरकारवर टीकास्त्र

लोकनेते गोपीनाथ  मुंडे साहेब यांनी समाजातील वंचित, पीडित व उपेक्षित घटकांच्या उत्थानासाठी आयुष्यभर संघर्ष केला म्हणून 3 जून हा त्यांचा पुण्यस्मरण दीन दरवर्षी 'सामाजिक उत्थान' दिवस म्हणून गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जातो, यानिमित्त विविध सामाजिक सेवा उपक्रमांचे देखील आयोजन करण्यात येत असते. यंदा मात्र कोविड महामारीची गंभीर परिस्थिती व नागरिकांचे आरोग्य लक्षात घेऊन गोपीनाथ गडावर कोणतेही जाहीर कार्यक्रम न करण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे, असं  पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं होतं.

First published: