महाराष्ट्र पोलीस प्रमुखांच्या हाती येणार दिल्लीची सूत्र, अमित शहा घेणार निर्णय

महाराष्ट्र पोलीस प्रमुखांच्या हाती येणार दिल्लीची सूत्र, अमित शहा घेणार निर्णय

सुबोधकुमार जयस्वाल हे 1985च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. कडक शिस्त आणि सचोटीचे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात.

  • Share this:

विवेक गुप्ता, मुंबई 27 जानेवारी : महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल हे पुन्हा एकदा दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. जयस्वाल यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून गृहमंत्री अमित शहा या बाबतीत निर्णय घेणार आहेत. जयस्वाल यांनी केंद्रीय गृप्तचर संस्था असलेल्या IB आणि RAWमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलं आहे. त्यांचा अनुभव आणि ज्येष्ठता लक्षात घेऊन त्यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. येत्या एक दोन दिवसांमध्ये यासंदर्भातला निर्णय जाहीर होईल अशी शक्यता आहे.

सुबोधकुमार जयस्वाल हे 1985च्या बॅचचे पोलीस अधिकारी आहेत. त्यांचं नाव गृहमंत्रालयाने निवडणूक आयोगाकडे पाठवलं आहे. दिल्लीत सध्या निवडणूक सुरू असल्याने आयोगाची परवानगी घेणं गरजेचं आहे. 31 जानेवारीला दिल्लीचे सध्याचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक हे निवृत्त होत आहेत. दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदी कुणाची नियुक्ती केली पाहिजे याबाबत सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहेत. त्याचं पालन करतच नवी नियुक्ती केली जाते.

...तर ठाकरे सरकारमधून बाहेर पडणार, अशोक चव्हाणांचा शिवसेनेला इशारा

या निर्देशांचं पालन करत ही नियुक्ती केली जाणार आहे. त्यानुसार विविध राज्यांमधल्या तीन ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उमेदवार म्हणून निवड केली जाते आणि त्यामधून एकाची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती होते. त्या अधिकाऱ्याची कारकिर्द ही उत्तम आणि स्वच्छ असावी असंही सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं.

लोकसभा निवडणुका झाल्यास महाराष्ट्रात भाजपला बसणार धक्का, दिल्लीत मोदींचाच झेंडा

कोण आहेत सुबोध कुमार जयस्वाल?

सुबोध कुमार जयस्वाल - जयस्वाल हे  आधी मुंबईचे पोलीस आयुक्त होते. ते सध्या राज्याचे महासंचलाक आहेत. केंद्रात आणि रॉमध्येही त्यांनी काम केलंय.

सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.

त्यांनी RAW आणि IB या  गुप्तचर संस्थेत 10 वर्ष महत्त्वाच्या पदावर काम केलंय.

त्यांना केंद्रातही सचिवपदावर काम करण्याचा अनुभव आहे.

2006 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या तपास पथकात ते सहभागी होते.

मुंबई पोलीस खात्यात त्यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही काम केले होतं

First published: January 27, 2020, 12:09 PM IST

ताज्या बातम्या