जिल्हा परिषद निवडणुकीवरुन देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला गंभीर इशारा

प्रातिनिधिक फोटो

'ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं. जोपर्यंत आरक्षण पूर्ववत होत नाही, तो पर्यंत निवडणुका होऊ देणार नाही आणि आज त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुका घोषित होतात'

  • Share this:
    मुंबई, 23 जून: स्थानिक संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द (obc reservation) झाले असताना 5 जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीची (zilla parishad by-elections) घोषणा झाली आहे. पण यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. 'कोणत्याही परीस्थितीत या निवडणूका रद्द झाल्या पाहिजे. अन्यथा भाजपा उग्र आंदोलन करेल' असा इशारा भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी दिला आहे. महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसीच राजकीय आरक्षण संपले असून राज्य सरकार आश्वसत करण्यात आले होते. पण त्यानंतरही ओबीसी मंत्र्यांनी परवा घोषित केलं. जोपर्यंत आरक्षण पूर्ववत होत नाही, तो पर्यंत निवडणुका होऊ देणार नाही आणि आज त्याच्या दुसऱ्याच दिवशी निवडणुका घोषित होतात. हा एक प्रकारे ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली. 'कोणत्याही परीस्थितीत या निवडणूका रद्द झाल्या पाहिजे. अन्यथा भाजपा उग्र आंदोलन करेल' असा इशारा फडणवीस यांनी सरकारला दिला. न्यायालयात जाण्याचा भाजपचा इशारा या निवडणुकांच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत.  राज्य सरकारने इम्पेरियल डाटा द्यावा अशी आमची मागणी आहे. मला वाटतं नाही की सरकार काही करत आहे. ते सरकारमध्ये आहे ते त्यांनी करावं.  हे लोक कोण आहे, याची सर्वांना माहिती घ्यावी ते कोणत्या पक्षाचे आहे. ते कोणत्या समाजाचे आहे. तुम्ही खोलात जा तुम्हाला कळेल, असा इशारा भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी दिला. मोदी, माल्ल्या, चोक्सीच्या मालमत्ता जप्तीतून 80 टक्के वसुली; 9371 कोटी बँकेत जमा तसंच विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी परिषद बोलावली आहे. मला निमंत्रण आहे. मी या परिषदेला जाणार आहे. त्याआधी 26 तारखेला आमचे आंदोलन आहे.  त्याआधी काही निर्णय झाला तर काही चूक होईल का, यात जाणीवपूर्वक केले जात आहे असं माझं म्हणणं नाही. पण यांनी आरक्षणासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न पण करत नाही, असं मला वाटतं, असंही दरेकर म्हणाले. महाराष्ट्र मेट्रोमध्ये विविध जागांसाठी पदभरती; इंजिनिअरिंग झालंय तर करा अप्लाय 'राज्य सरकार दडपशाहीचे  धोरण अवलंबत आहे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नाकडे सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. 26 जून रोजी राज्यभर ओबीसीच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे, आणि या आंदोलनाला रत्नागिरी जिल्ह्यातील ओबीसी नेत्याने पाठिंबा द्यावा यासाठी आज चित्रा वाघ रत्नागिरी दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.
    Published by:sachin Salve
    First published: