मुंबई, 16 नोव्हेंबर : 'सरकार येणार की नाही हे मनातून काढून टाका, येईल तर बोनसच. काही चिंता करू नका. पण जनतेसाठी लढा देण्यासाठी आपल्याला उतरायचं आहे. सरकार येईल तेव्हा येईल. जनतेसाठी आपली अंतिम लढाई आहे' असं म्हणत भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी महाविकास आघाडी सरकारविरोधात नव्या लढाईचे रणशिंग फुंकले.
मुंबईमध्ये भाजपची कार्याकारणीची बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती हिंसाचार प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. तसंच, आगामी निवडणुका डोळ्यासमोर पुढे ठेवून फडणवीस यांनी नवीन भूमिका मांडली आहे.
'सरकार येणार की नाही हे मनातून काढून टाका, येईल तर बोनसच. काही चिंता करू नका. पण जनतेसाठी लढा देण्यासाठी आपल्याला उतरायचं आहे. सरकार येईल तेव्हा येईल. जनतेसाठी आपली अंतिम लढाई आहे. लोकशाहीने ज्या आंदोलनाचा अधिकार दिला ते आपलं शस्त्र आहे. मोदींनी जनतेवर प्रेम आहे तिच आपली शिदोरी आहे. प्रथम स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत आपल्याला विजय मिळवायचा आहे. जेव्हा 2024 च्या निवडणुका होती तेव्हा पूर्ण बहुमताने आपलं सरकार आणायचं आहे, असं फडणवीस म्हणाले.
'राहुल गांधी यांना त्रिपुरामध्ये काय घडलं याची कल्पना होती. तिथे मशिद जाळली नाही, कुराण जाळले नाही, कुणाला दुखापत झाली नाही. पण, त्यानंतर राहुल गांधी यांनी ९ तारखेला ट्वीट केले. त्यानंतर ११ तारखेला मालेगावात मोर्चे निघले. मालेगावात एकाच वेळी हजारो लोकांच्या संख्येनं मोर्चे कसे काढतात. संपूर्ण सरकारच्या समर्थनाने हे मोर्चे निघाले आहे. हा प्रयोग आहे. निवडून निवडून हिंदूची दुकानं जाळली, यावर कोणी बोलत नाही. हिंदूचे दुकान जाळले तेव्हा महाविकास आघाडी सरकारचा नेता कुणी बोलला का, दूकान हिंदूचे मुस्लिमाचे असो जाळणे चुकीचे आहे. सरकारच्या नेत्यांची तोंड शिवली गेली होती का? असा सवाल फडणवीसांनी विचारला.
'मला जमिनीवर उतरवणारी..'असं म्हणत समीर चौगुलेंची पत्नीसाठी खास पोस्ट
तसंच,'संजय राऊत यांचं मला आश्चर्य वाटतं. एक गाणं होतं, 'कोण होतास तू काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू'. भाजपने दंगल पेटवली असा आरोप करत आहे. नवाब मलिक यांचा तर प्रश्न नाही, हर्बल तंबाखू वगैरेमुळे. मुळात त्यांना ठेवलेच त्यासाठी. हे षडयंत्र उघड होऊ नये म्हणून त्यांनी भाजपवर आरोप केला, असंही फडणवीस म्हणाले.
रब्बी पिकांना अवकाळी पावसाचा धोका; पुढील 4 दिवस महत्त्वाचे, पुण्यालाही इशारा
'आम्ही दंगल करणारे लोक नाही. पण जर कोणी अंगावर धावून आलो तर आम्ही ते सहन करणार नाही.सरकारला वाटत असेल की आम्ही सत्तेत आहेत काहीही करू तर तसे होणार नाही, आम्ही रस्त्यावर उतरू. भाजपचा कार्यकर्ता कुठल्याही निष्पाप लोकावर हल्ला करणार नाही. एखाद्यावेळेस अल्पसंख्याकाला भाजपचा कार्यकर्ता मदत करेल. पण जर आमच्यावर कुणी चाल करून आलं तर आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशाराही फडणवीसांनी दिला.
'हे कायद्याचे राज्य नाही. काय द्यायचे राज्य आहे, सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचे कपडे काढले तरी हे निर्लज्ज आहे. त्यामुळे आपल्याला रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल. ज्यापद्धतीने देशद्रोह्यांबरेबर तुमची पार्टनरशीप, अवैध रेती, अवैध दारू असाच प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. भ्रष्टमार्गाने चालायची सवय नोकरशाहीला लागली तर ती लवकर जात नाही. कोटी कोटी रूपये देवून लोक पदावर येत असतील तर काय होईल. आपण या विरूद्ध संघर्ष करायचा आहे.लढाई समोरासमोर लढावी लागते, असंही फडणवीस म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.