मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले', काँग्रेस नेत्याची सडकून टीका

'देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडले', काँग्रेस नेत्याची सडकून टीका

93 देशांना आमची लस विकण्यात आली. 17 देशांतून लशीसाठी कच्चा माल येतो, त्यांना लस द्यायचा करार आहे. मग 93 देशांना का लस विकली?

93 देशांना आमची लस विकण्यात आली. 17 देशांतून लशीसाठी कच्चा माल येतो, त्यांना लस द्यायचा करार आहे. मग 93 देशांना का लस विकली?

93 देशांना आमची लस विकण्यात आली. 17 देशांतून लशीसाठी कच्चा माल येतो, त्यांना लस द्यायचा करार आहे. मग 93 देशांना का लस विकली?

मुंबई, 24 मे : राज्यावर कोरोनाचे (maharashtra Corona case) संकट असताना राजकीय आखाडा दिवसेंदिवस चांगलाच तापला आहे. महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे.  'देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करतायत. जरा तपासून घ्या स्वत:ला' अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी टीकास्त्र सोडले आहे.

भाई जगताप यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला.  'केंद्र सरकार काही राजा नाही. त्यांनी सर्वांना मदत करायला हवी. आपली नैतिकता त्यांनी गुजरातला बांधलीय. गुजरातला मदत केली मग इतर राज्यांना का नाही ? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 हजार कोटींचे पॅकेज द्यावे. परंतु, त्यांचा महाराष्ट्रद्वेष पाहता ते काही देतील अशी अपेक्षा नाही,परंतु महाराष्ट्र सरकारने चांगली मदत करावी, असंही भाई जगताप म्हणाले.

...तरीही या सरकारने गाढवपणा केला, विनायक मेटेंची विखारी टीका

'म्युकर मायकोसिसवरील औषधे आता केंद्राच्या परवानगीशिवाय राज्यांना विकत घेता येणार नाहीत. केंद्राकडून राज्याला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे.  कालपर्यंत आम्ही रक्ताचे 7 हजार युनिटस रक्तादानाद्वारे जमवले आहे. 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने ढकलण्याचे काम केले आहे. 93 देशांना आमची लस विकण्यात आली. 17 देशांतून लशीसाठी कच्चा माल येतो, त्यांना लस द्यायचा करार आहे. मग 93 देशांना का लस विकली?' असा सवाल भाई जगताप यांनी विचारला आहे.

Supreme Court ची सरकारला विचारणा, डेथ सर्टिफिकेटवर कोरोनाचा उल्लेख का नाही?

'दीडशे रूपयांची लस विकायची आणि 1 हजारांची स्पुटनिक लस विकत घ्यायची, हा कुठला प्रकार आहे याविरोधात आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलन करणार आहोत. सकाळी 10 ते 11 या वेळेत प्रत्येक विधानसभा क्षेत्रात मार्केट किंवा लसीकरण ठिकाणी मानवी साखळी तयार करून निषेध व्यक्त करणार आहोत. उद्या उत्तर मुंबईत हे आंदोलन होईल. 'मोदीजी आमच्या मुलांची लस तुम्ही बाहेर का विकली? असे पोस्टर हातात घेवून आंदोलन केले जाईल' अशी माहितीही भाई जगताप यांनी दिली.

First published:

Tags: Congress