Home /News /mumbai /

Maharashtra Nagar Panchayat Election Result 2022 : महाविकास आघाडीने बाजी मारली की भाजपने? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Nagar Panchayat Election Result 2022 : महाविकास आघाडीने बाजी मारली की भाजपने? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

'मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील

'मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील

'मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील

    मुंबई, 19 जानेवारी :राज्यातील 32 जिल्ह्यांच्या 106 नगरपंचायतींमधील 1802 जागांचा निकाल (Maharashtra Nagar Panchayat Election Result 2022 ) स्पष्ट झाला आहे. महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकत भाजपचा धोबीपछाड दिला आहे. तर दुसरीकडे 'मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यात' असा दावा, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी केला आहे. राज्यातील स्थानिक निवडणुकांच्या निमित्ताने महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच पाहण्यास मिळाली. नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून प्रतिक्रिया दिली. मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील. भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्यात.  भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. तसंच, जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो, असंही फडणवीस म्हणाले. बीडमध्ये भाजपची सत्ता; पंकजा मुंडेंचा राष्ट्रवादीला धक्का बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये (Beed district 5 Nagar Panchayat Election) प्रतिष्ठितांना धक्का देत निर्णायक निकाल हाती आले आहेत. आष्टी, पाटोदा, शिरूर नगरपंचायतमध्ये भाजपने एकहाती सत्ता (BJP win maximum seats in Ashti, Patoda, Shirur) मिळवत महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का (big jolt for Dhanajay Munde in Beed) समजला जात असून स्थानिक स्वराज्य संस्थेत पुन्हा एकदा सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली पंकजा मुंडेनी बाजी मारली आहे. केज नगरपंचायतमध्ये काँग्रेसच्या ताब्यातील नगरपंचायत जनविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई पाटील यांना पराभव सहन करावा लागला आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय भाजपाचे ज्येष्ठ नेते राजू भाऊ मुंडे यांच्या ताब्यातील वडवणी नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात गेल्यामुळे भाजपला एक मोठा धक्का समजला जात आहे. नांदेड जिल्ह्यात भाजपचा धुव्वा, अशोक चव्हाणांनी गड राखला औरंगाबादमध्ये भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्यात शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांना यश आलंय. तर दुसरीकडे नांदेडमध्ये काहीसं वेगळं चित्र बघायला मिळालं आहे. अमरावतीत मंत्री यशोमती ठाकूर यांचं जसं वर्चस्व अबाधित राहिलेलं बघायला मिळालंय. तसंच नांदेड जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या बाबतीतही बघायला मिळतंय. नांदेड जिल्ह्यातील तीन नगरपंतायतींचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नायगाव, अर्धापूर, माहूर नगरपंचायतींचा समावेश आहे. या तीनही नगरपंचायतींमध्ये काँग्रेसला निर्विवाद विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगाव नगरपंचायतीत काँग्रेसला तब्बल 17 पैकी 17 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे नायगावमध्ये भाजप आमदार राजेश पवार यांची सत्ता आहे. त्यामुळे भाजप आमदार राजेश पवार यांना हा सर्वात मोठा झटका आहे. नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतीत मुसंडी मारली आहे. काँग्रेसने नायगाव पाठोपाठ अर्धापूर नगरपंचायतीत 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता मिळवली आहे. तर माहूर नगरपंतायतीवरही काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. माहूर नगरपंतायतीत 17 पैकी 6 जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला सात आणि शिवसेनेला तीन जागांवर यश मिळालं आहे. कर्जत नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा धडाकेबाज विजय भाजपला अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून मोठा धक्का बसला आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती त्या जागेवर भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं दृश्य आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलं आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकणू 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे या नगरपंचयातीत काँग्रेसलाही 3 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीच महाविकास आघाडीचा तब्बल 15 जागांवर विजय झाला आहे. कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.मा. मोदीजींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: देवेंद्र फडणवीस

    पुढील बातम्या