S M L

अनिल गोटेंचं विधान अयोग्यच, मुख्यमंत्र्यांनी बजावलं

गोटे जे बोलले ते सभागृहच्या उंचीला शोभणारे नाही. संविधानाने ही सभागृह तयार झाली आहे. कोणते सभागृह मोठे असं सुद्धा काहीही सांगितलं नाही

Sachin Salve | Updated On: Mar 31, 2017 07:47 PM IST

अनिल गोटेंचं विधान अयोग्यच, मुख्यमंत्र्यांनी बजावलं

31 मार्च : अनिल गोटेंनी केलेलं वक्तव्य सभागृहाच्या उंचीला शोभणारं नाही. गोटेंच्या विधानाशी सरकार म्हणून आणि व्यक्तिगतरित्या सहमत नसल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच गोटेंना समज दिल्याचंही त्यांनी सांगितलं.

विधान परिषद बरखास्त करावी अशी भाजपचेच आमदार अनिल गोटेंच्या मागणीवरुन वादंग निर्माण झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधान परिषदेत निवेदन केलं. त्याअगोदर काँग्रेस नेते नारायण राणेंनीही गोटेंच्या वक्तव्यावरुन सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं.

गोटे जे बोलले ते सभागृहच्या उंचीला शोभणारे नाही. संविधानाने ही सभागृह तयार झाली आहे. कोणते सभागृह मोठे असं सुद्धा काहीही सांगितलं नाही. मात्र विधानपरिषद हे ज्येष्ठाचे सभागृह म्हणून ओळखले जाते असंही मुख्यमंत्री म्हणाले.तसंच गोटे यांच्या विधानाशी शासन म्हणून नाही तर व्यक्तिगत ही सहमत नाही. आज मी त्यांना बोलावून सांगितलं आहे असं मत व्यक्तिगत असलं तरी मांडणं शोभत नाही, मांडू ही नये. या सभागृहाचा मान राखला जाईल. ते आमचं कर्तव्य आहे. या सभागृहाबाबत केलेल्या विधानाला समर्थन नाही. विधान अयोग्यच. संपूर्ण सभागृहाचा आदर आहे, सरकारला हे आवडले नाही, मलाही वैयक्तिक आवडले नाही. मी गोटे यांना बोलवले आणि सभागृहचे अवमान करणारे मत तुम्हाला मांडता येणार नाही असे स्पष्ट सांगितलं. या सभागृहाबद्दल कोणती द्विधा मत आमच्या मनात नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 07:46 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close