Home /News /mumbai /

'मेट्रोच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल पण...'; फडणवीसांचा सरकारवर निशाणा

'मेट्रोच्या उद्घाटनाला आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल पण...'; फडणवीसांचा सरकारवर निशाणा

मेट्रोच्या उद्घाटनाबाबत बोलताना ते म्हणाले, जरुर मेट्रोचं उद्घाटन करावं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र जनतेला माहिती आहे की दोन्ही मेट्रोचं काम मी सुरु केलं, अतिशय वेगाने ते सुरु होतं

नागपूर 02 एप्रिल : गुढीपाडव्याच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागरिकांसोबत संवाद साधला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, की गुढीपाडव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना भगवं तेज अनुभवायला मिळत आहे. मोठ्या उत्साहात गुढीपाडवा (Gudi Padwa 2022) साजरा होत आहे. नवीन वर्ष सुख समृद्धी, आणि आरोग्यदायी जावो. यावळेचं वेगळेपण असं आहे की एकीकडे श्री रामाची मिरवणूक काढत असताना, अयोध्येत श्री रामाच्या मंदिराचं प्रत्यक्ष निर्माण वेगाने होत आहे. येत्या काळात नववर्षाचा दिवस श्री रामाच्या सानिध्यात अयोध्येत साजरा करता येईल. VIDEO: औरंगाबादजवळ संपूर्ण मालगाडी रुळावरुन घसरली; वाहतूक विस्कळीत झाल्याने सणासुदीच्या दिवशी प्रवाशांचे हाल यानंतर मेट्रोच्या उद्घाटनाबाबत बोलताना ते म्हणाले, जरुर मेट्रोचं उद्घाटन करावं, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र जनतेला माहिती आहे की दोन्ही मेट्रोचं काम मी सुरु केलं, अतिशय वेगाने ते सुरु होतं. या सरकारमध्ये मेट्रोचं काम रखडलं होतं. उद्घाटनाला आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा. मेट्रो ३ चा प्रश्न निकाली काढा. कारण मेट्रो ३ आतापर्यंत सुरु होऊ शकली असती, पण चार वर्षे सुरु होऊ शकणार नाही. शिक्षिका बाथरूममध्ये जाण्याआधी आत ठेवायचा मोबाईल अन्...; पुण्यातील अल्पवयीन मुलाचं धक्कादायक कृत्य पुढे ते म्हणाले, की सरकारने श्रेय नक्की घ्यावं पण अपश्रेयाचं भागीदार होऊ नये . सरकारने मेट्रो तीनचा प्रकल्प लवकर सुरु करावा. ९ महिन्यात आरेमधील कारशेडचं काम पूर्ण होऊ शकतं. मुंबईतील सर्वात महत्त्वाची मेट्रो ३ सरकारने सुरु करावी. त्याही कार्यक्रमात आम्हाला बोलावलं नाही तरी चालेल
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Devendra Fadnavis, Pune metro

पुढील बातम्या