मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Devendra Fadnavis: "सोलापुरातही एक सचिन वाझे, लाखोंची वसुली करतो" देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis: "सोलापुरातही एक सचिन वाझे, लाखोंची वसुली करतो" देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

"सोलापुरातही एक सचिन वाझे, लाखोंची वसुली करतो" देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

"सोलापुरातही एक सचिन वाझे, लाखोंची वसुली करतो" देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

Devendra Fadnavis: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. पोलीस दलात आणखी एक सचिन वाझे असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.

  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 24 मार्च : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government)वर आरोपांचे पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत असतानाच आता आणखी एक खळबळजनक आरोप केला आहे. पोलीस दलात आणखी एक सचिन वाझे असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  देवेंद्र फडणवीस म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातही एक सचिन वाझे (Sachin Vaze) आहे. हा सचिन वाझे क्राईम ब्राँचसाठी महिन्याला 60 लाख रुपयांची वसुली करतो. याचं स्टिंग ऑपरेशन झालं आहे. त्याचा पेन ड्राईव्ह आहे. तो माझा नाहीये. तिथल्या पत्रकाराने तो पेन ड्राईव्ह सरकारकडे दिलाय. माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पवार यांनी संपूर्ण क्लिप मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे. या क्लिपमध्ये तो म्हणतो उपरतक देणा पडता है. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस आयुक्तालयाकडून सुरू असलेल्या वसुलीची तक्रार अँन्टी करप्शनला होत आहे. सभागृहात सदस्यांनी बोललल्यानंतर तक्यांच्यावर प्रशासन राग धरणार असेल तर बोलायचं की नाही हा प्रश्न निर्माण होतो. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी तेथील अवैध व्यवसायांबाबत विषय मांडला. याबाबत राज्यमंत्र्यांनी तेथे येऊन बैठक घेतली त्यात लोकप्रतिनिधी आले. त्या लोकप्रतिनिधींनी तेथे काही पुराव्यांसह तक्रारी केल्या की कशाप्रकारे अवैध धंदे सुरू आहेत. वाचा : फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब क्रमांक 3: मुंबईतील मोठ्या नेत्याची बारामतीत जाऊन मध्यस्थी, तो नेता कोण? तेव्हापासून या लोकप्रतिनिधींना टार्गेट करण्याचं काम सुरू आहे. राजेंद्र राऊत यांना तर खुलेपणाने सांगितलं आहे की, तुम्हाला कुठल्या तरी गुन्ह्यात घेणारच आणि तुमच्या मुलाला फसवणारच. तेथील पीआय आहेत त्यांचा रेकॉर्ड काय आहे आणि किती वेळा निवृत्त झाले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व अवैध धंदे सुरू असतील तर आमदारांनी काय गप्प बसायचं?. वाचा : देवेंद्र फडणवीसांचा आणखी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब, BMC तील भ्रष्टाचाराबाबत केला गौप्यस्फोट गृहराज्यमंत्री बैठकीला गेले होते काय काय तक्रारी त्यांच्याकडे आल्या हे त्यांना माहिती आहे. अवैध धंद्यांबाबत सभागृहात बोललो म्हणून पोलिसांकडून दंडूकीशाही होत असेल तर चुकीचं आहे. मी सांगतो की, राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा जीव धोकात आहे. तसे पत्रही पोलीस महासंचालकांना दिला आहे. कारवाई होणआर नाही हे मला माहिती आहे. मी ठरवलं आहे जर अशा प्रकारे वागणूक मिळणार असेल तर मी स्वत: त्या ठिकाणी जाईल आणि हजारोंच्या संख्येत त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला घेराव घालेल. हे चालणार नाही असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, गुन्हेगारांची मजल किती गेली आहे. चक्क अजित पवारांचा नंबर फोर्ज करुन खंडणी वसुल करण्यात येते. 20 लाखांची खंडणी मागितली. त्यातील 2 लाख स्वीकारले सुद्धा. ठीक आहे की, पोलिसांनी आरोपीला अटक केलीय.
First published:

Tags: Budget, Devendra Fadnavis, Maharashtra police, Sachin vaze, Solapur

पुढील बातम्या