Home /News /mumbai /

शिवसेना-भाजपची पुन्हा युती? अब्दुल सत्तारांच्या विधानावर फडणवीसांनी म्हटलं, 'नया है वह !'

शिवसेना-भाजपची पुन्हा युती? अब्दुल सत्तारांच्या विधानावर फडणवीसांनी म्हटलं, 'नया है वह !'

शिवसेना-भाजपची पुन्हा युती? अब्दुल सत्तारांच्या विधानावर फडणवीसांनी म्हटलं, 'नया है वह !'

शिवसेना-भाजपची पुन्हा युती? अब्दुल सत्तारांच्या विधानावर फडणवीसांनी म्हटलं, 'नया है वह !'

Devendra Fadnavis replied to Abdul sattar : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

  मुंबई, 5 जानेवारी : शिवसेना आणि भाजपची युती (Shiv Sena BJP alliance) तुटल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार स्थापन झाले. त्याननंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. हे सर्व सुरू असताना शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत एक विधान केलं आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अब्दुल सत्तार यांनी केलेल्या या विधानावर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तार... 'नया है वह' देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं, मला अतिशय आनंद आहे की, अब्दुल सत्तार यांना असं वाटतं की नितीन गडकरी हे करू शकतात. नितीनजी आमचे मोठे नेते आहेत. अब्दुल सत्तार आमचे मोठे नेते आहेत. पण अब्दुल सत्तार... 'नया है वह', त्यांना काय माहिती आहे शिवसेनेचं?. काहीच माहिती नाही त्यांना सेनेचं. देवेंद्र फडणवीस यांनी पुढे म्हटलं, मला तर असं वाटतं की, ते (अब्दुल सत्तार) कधी... गेल्या पाच सात महिन्यांत... आता तर उद्धवजी आजारी आहेत. त्याच्या पूर्वी पाच सात महिन्यांत उद्धवजींना अब्दुल सत्तार भेटले तरी आहेत का? मला माहिती नाही. महत्वाचं माणूस लागतं ना असं बोलायला. वाचा : शिवसेनेत मोठ्या बदलाचे संकेत काय म्हणाले होते अब्दुल सत्तार ? राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी न्यूज 18 लोकमत सोबत संवाद साधताना शिवसेना-भाजप युतीबाबत भाष्य केलं आहे. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला तर राज्यात भाजप आणि शिवसेना एकत्र येवू शकतात. गडकरी यांचे ठाकरे कुटुंबियांसोबत अतिशय जवळचे नाते आहे. नितीन गडकरी ज्येष्ठ नेते आहेत. नितीन गडकरी आणि ठाकरे परिवाराचे जवळचे संबंध आहेत. उद्धव ठाकरे हे सुद्धा नितीन गडकरींचा खूप सन्मान करतात, आदर करातत. यापूर्वीचा इतिहास पाहिला तर नितीन गडकरी यांनी युती करण्याचा निर्णय घेतला आणि उद्धव ठाकरेंनी मान्य केला तर प्रश्नच मिटेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले. आज राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. यात राज्याचे नुकसान होऊ नये. यामुळे नितीन गडकरी यांच्या सारख्या राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला निश्चितच मार्ग निघेल असंही अब्दुल सत्तार म्हणाले.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: BJP, Devendra Fadnavis, Shiv sena

  पुढील बातम्या