मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'पक्षभेद विसरून एकत्र यायला भाग...', फडणवीसांशेजारी बसून रोहित पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह!

'पक्षभेद विसरून एकत्र यायला भाग...', फडणवीसांशेजारी बसून रोहित पवारांचा स्ट्रेट ड्राईव्ह!

देवेंद्र फडणवीस-रोहित पवार एकत्र

देवेंद्र फडणवीस-रोहित पवार एकत्र

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे, पण अधिवेशन सुरू असतानाच मुंबईमध्ये आज वेगळाच प्रकार पाहायला मिळाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 17 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे, पण अधिवेशन सुरू असतानाच मुंबईमध्ये आज वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार एकत्र दिसले. मुख्य म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी बसलेला एक फोटो रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना झाला. हा सामना पाहण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रोहित पवार आले होते. हा सामना बघतानाचा फोटो रोहित पवारांनी ट्वीट केला आहे. या फोटोला रोहित पवारांनी कॅप्शनही सूचक दिलं आहे.

'पक्षभेद विसरून सर्वांना एकत्र यायला भाग पाडतो तो खेळ असतो आणि महाराष्ट्रात नेहमीच असं खिलाडू वातावरण बघायला मिळतं. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांच्यासोबतचा असाच एक क्षण…' असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं आहे.

क्रिकेटच्या राजकारणामध्ये मागच्या काही महिन्यात सर्वपक्षीय युती पाहायला मिळाली. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये आशिष शेलार, शरद पवार तसंच मिलिंद नार्वेकर एकत्र आले. तसंच रोहित पवार महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले.

First published:

Tags: Devendra Fadnavis, Rohit pawar