मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब; घडाळ्यात 'तो' छुपा कॅमेरा कोणी लावला? स्टिंग ऑपरेशन कोणी केलं? प्रवीण चव्हाण म्हणाले....

देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब; घडाळ्यात 'तो' छुपा कॅमेरा कोणी लावला? स्टिंग ऑपरेशन कोणी केलं? प्रवीण चव्हाण म्हणाले....

फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बबाबत मोठा खुलासा; घडाळ्यात 'तो' छुपा कॅमेरा कोणी लावला? प्रविण चव्हाणांनी म्हटलं...

फडणवीसांच्या पेन ड्राईव्ह बॉम्बबाबत मोठा खुलासा; घडाळ्यात 'तो' छुपा कॅमेरा कोणी लावला? प्रविण चव्हाणांनी म्हटलं...

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत पेन ड्राईव्ह सादर केले. या पेन ड्राईव्हमध्ये स्टिंग ऑपरेशनचे व्हिडीओ होते आणि भाजप नेत्यांना कशाप्रकारे अडकवण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत आहेत याचा पुरावा असल्याचं फडणवीसांनी आरोप केला. या स्टिंग ऑपरेशनमुळे एकच खळबळ उडाली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Sunil Desale
मुंबई, 12 मार्च : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मंगळवारी (8 मार्च 2022) राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक पेन ड्राईव्ह बॉम्ब टाकत खळबळ उडवून दिली. 125 तासांचे स्टिंग ऑपरेशन (Sting operation pen drive) असलेले 29 वेगवेगळे पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी सादर केले. विशेष सरकारी वकील आणि काही पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन विरोधी पक्षातील नेत्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्यात येत असल्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलेले सरकारी वकिल प्रवीण चव्हाण (Advocate Pravin Chavan) यांनी माध्यमांना मुलाखत देताना आता एक मोठा खुलासा केला आहे. व्हिडीओची मोडतोड केल्याचा दावा सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपा कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. भाजपने केवळ एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. व्हिडीओची मोडतोड करण्यात आली आहे. व्हिडीओ आणि आवाज मॅनिप्युलेट केले आहेत. या स्टिंग ऑपरेशनच्या संदर्भात चौकशी केल्यावर सत्य समोर येईल. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत वकिल प्रवीण चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा : "देवेंद्र आहेत ते तळपती तलवार, भ्रष्टाचाऱ्यांनो लवकरच तुमचा बाजार उठवणार" अतुल भातखळकरांच्या ट्विटने चर्चांना उधाण घडाळ्यात छुपा कॅमेरा कोणी लावला? प्रवीण चव्हाण म्हणाले, माझ्या कार्यालयात तेसज मोरे याचा जामीन अर्ज होता. त्याचा सहभाग यात असण्याची दाट शक्यता आहे. ते घड्याळ त्यानेच इथे आणलं होतं. त्याने एसी बसवून देण्याचं म्हटलं होतं, स्मार्ट टीव्ही लावण्याचं म्हटलं होतं मी नकार दिला होता. त्याचा अटकपूर्व जामीन मी केला होता आणि त्याची फी सुद्धा अद्याप बाकी आहे. तो माझा अशील होता. तेजस मोरे जळगावचा आहे. त्यानेच माझ्या कार्यालयात दोन महिन्यांपूर्वी घड्याळ आणून लावले होते. तेजस मोरे जेलमध्ये असताना त्याची ओळख चाचू याच्यासोबत झाली. हा चाचू नावाचा कैदी सुद्धा येथे आल्याचं सीसीटीव्हीत दिसत आहे. तो आता नांदेडला पळून गेला आहे. वाचा : देवेंद्र फडणवीसांचा पेन ड्राईव्ह बॉम्ब फुसका बार? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करत केला मोठा दावा शरद पवारांचा उल्लेख केला होता? स्टिंग ऑपरेशनमध्ये मोठे साहेब उल्लेख केला आहे आणि तो उल्लेख शरद पवारांच्या नावाचा असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस केला आहे. यावर प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं, त्यात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. मी जवळपास सर्वच संवेदनशील केसेसवर काम करतो. त्या सर्व केसेसमधील आरोपींना जामीन मिळालेला नाहीये. या वकिलाला आपण बाजूला केलं तरच आपल्याला जामीन मिळू शकतो अशी आरोपींची भावना असण्याची शक्यता आहे. या वकिलाला आपण फोडू शकत नाही, मॅनेज करु शकत नाही त्यामुळे त्यांनी हा केविलवाणा प्रयत्न केला आहे. याचं सत्य आज नाही तर उद्या समोर येईल असंही वकिल प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं आहे. आपण व्हिडीओ पाहिले तर लक्षात येतं की, कुठल्याही प्रकारचं त्यात मॅचिंग नाहीये. दुसरं म्हणजे व्हिडीओत मॅनिप्युलेट केल्याचं दिसून येत. तिसरं म्हणजे आक्षेपार्ह वक्तव्य त्यात कुठेही दिसत नाहीये. आजच्या काळात आवाजाचं आणि व्हिडीओ सुद्धा मॅनिप्युलेट करता येतं. दुसरं म्हणजे व्हिडीओ कट केलेले आहेत आणि याचा अर्थ अगोदरचा मजकूर त्यांनी लपवलेला दिसत आहे असंही प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं.
First published:

Tags: Cctv footage, Devendra Fadnavis, Maharashtra

पुढील बातम्या