स्वबळावर निवडणुका लढण्याच्या नाऱ्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, सरकारला लगावला सणसणीत टोला

स्वबळावर निवडणुका लढण्याच्या नाऱ्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, सरकारला लगावला सणसणीत टोला

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस (Congress Party) कडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे, यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. अशात आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

मुंबई 21 जून : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस (Congress Party) कडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. यावर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने प्रतिक्रिया दिली होती. यावर आता विरोधीपक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले, की भाजपही स्वबळावर निवडणूक लढवू शकतं.

पुढे राज्यातील महाविकासआघाडी सरकारला टोला लगावत ते म्हणाले, की हे महाविकासआघाडीला ठरवायचं आहे, की ते कोणासोबत युती करतील? एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

'हिंमत असेल तर निलेश-नितेश यांनी खुल्या मैदानात यावं'; सेनेचं चॅलेंज

स्वबळावर निवडणुका लढण्याचे नारे काँग्रेस गेल्या काही दिवसांपासूव देत आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तसं जाहीर वक्तव्य सुद्धा केलं आहे. त्यामुळेच, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला आहे. वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं होतं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंनी आपल्या संबोधनात म्हटलं, अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे.

Published by: Kiran Pharate
First published: June 21, 2021, 6:32 AM IST

ताज्या बातम्या