Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंनी 100 कोटींची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची नवी मागणी

उद्धव ठाकरेंनी 100 कोटींची घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची नवी मागणी

Nagpur: Former Maharashtra chief minister Devendra Fadnavis addresses a press conference during the fourth day of the winter session of Maharashtra State Assembly at Vidhan Bhawan, in Nagpur, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo)
(PTI12_19_2019_000157B)

Nagpur: Former Maharashtra chief minister Devendra Fadnavis addresses a press conference during the fourth day of the winter session of Maharashtra State Assembly at Vidhan Bhawan, in Nagpur, Thursday, Dec. 19, 2019. (PTI Photo) (PTI12_19_2019_000157B)

भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मागणी केली आहे.

मुंबई, 5 जून : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणासह महाराष्ट्रातील विविध भागात मोठं नुकसान झालं. या चक्रीवादळाचा रायगड जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत रायगडसाठी 100 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. मात्र त्यानंतर आता भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मागणी केली आहे. 'निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई आणि कोकण विभागातील लोकप्रतिनिधींशी आज व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करून एकूणच स्थितीचा आढावा घेतला. प्रचंड नुकसान झालेले असल्याने राज्य सरकारने तातडीने कोकणवासियांना मदत करण्याची गरज आहे. शेती, फळबागा, घरे, मासेमार, वृक्ष उन्मळून पडणे, जनावरांचे मृत्यू, पायाभूत सुविधांना क्षती असे मोठेच नुकसान या वादळाने झाले. वीज आणि दूरध्वनी सेवा अद्यापही खंडित आहेत. अशास्थितीत पंचमाने तर त्वरेने करावेच लागतील. पण, तोवर तातडीने आणि रोखीने मदत करण्याची नितांत गरज आहे,' असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 'केवळ रायगड नाही, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या भागात सुद्धा मोठे नुकसान झालेले आहे. राज्य सरकारने तातडीने मदत द्यावी. या संकटात प्रत्येक कोकणवासियांच्या पाठिशी भाजपा भक्कमपणे उभा असेल. मदतसामुग्रीसह तातडीने चमू कोकणात रवाना करण्याच्या दृष्टीने आज एक नियोजन केले. कोरोनाच्या काळात जसे मदतकार्य भाजपाने उभे केले आणि आजही ते अव्याहतपणे सुरू आहे, तसेच आता कोकणात हे मदतकार्य केले जाईल. लोकप्रतिनिधी, संपर्कप्रमुख यांना तालुकानिहाय यासाठीच्या जबाबदारींचे वाटप करण्यात येईल,' असंही फडणवीस म्हणाले.
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या