Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

देवेंद्र फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, राजकीय चर्चेला उधाण

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and Shiv Sena Executive President Uddhav Thackeray interact during an event to mark the birth anniversary of Sena Suprimo late Balasaheb Thackeray at State Transport headquarter in Mumbai on Saturday. PTI Photo (PTI1_20_2018_000153B)

Mumbai: Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis and Shiv Sena Executive President Uddhav Thackeray interact during an event to mark the birth anniversary of Sena Suprimo late Balasaheb Thackeray at State Transport headquarter in Mumbai on Saturday. PTI Photo (PTI1_20_2018_000153B)

काँग्रेसने ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे.

मुंबई 13 जून:  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरी उपस्थित होते. मुंबईत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकात ही भेट झाली. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई सुद्धा उपस्थित होते. या बैठकीत "निसर्ग" चक्रिवादळ आपत्ती संदर्भात चर्चा होणार असल्याची माहीती मिळतेय. पण त्याच बरोबर राजकिय विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाशी लढाई सुरू असतानाच आरोप-प्रत्यारोपांनाही सुरूवात झाली आहे. तर काँग्रेसने ठाकरे सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्या भेटीकडे सगळ्यांचं लक्षं लागलं आहे. फडणवीसांनी नुकताच कोकणचा दौरा केला होता. चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली होती. त्यानंतर  लोकांना मदत मिळावी म्हणून ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे. मुख्यंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा कोकणच्या दौऱ्यावर जाऊन आले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेही कोकण दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावरून टीका टिप्पणीही झाली होती. निसर्ग चक्रीवादळात रायगड, सिंधुदूर्ग आणि रत्नागीरी जिल्ह्याचं मोठं नुकसान झालं होतं. या  बैठकीत "निसर्ग" चक्रिवादळाने केलेल्या नुकसानी संदर्भात चर्चा झाली. तसेच नुकसानग्रस्तांना देण्यात येणाऱ्या आर्थिक मदती संदर्भात चर्चा झाल्याची माहीती विरोधी पक्ष नते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  "निसर्ग" चक्रिवादळामुळे झालेल्या नुकसानी नंतर सरकारची कोणतीही मदत जमीनीवर पोहचली नसल्याचा आरोप यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलांय. दरम्यान, गुरुवारी काँग्रेस मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडीत राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काॅंग्रेसच्या भूमिकेला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली. यामुळे या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं. या सरकारच्या स्थापनेपासून काँग्रेसमध्ये आपल्याला डावलल्या गेल्याची भावना आहे. मग मंत्रीमंडळातील मंत्रीपदांचा मुद्दा असेल किंवा काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसला दोन उमेदवार जागा हव्या होत्या पण आघाडी धर्माच्या नावाखाली काँग्रेसला त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा लागला. हे वाचा -  PM मोदी 'या' तारखांना पुन्हा करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सगळ्या देशाचं लक्षं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेटीगाठी होऊन सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल शिक्कामोर्तब होतं असतं. या सरकारवर शरद पवार यांची मजबूत पकड आहे असं चित्र वारंवार दिसत असतं. असं सगळं होत असताना काँग्रेस मात्र तिस-या एका कोप-यात एकटी असल्याचं चित्र सतत समोर येतंय आणि हीच गोष्ट पक्षाच्या दृष्टीने योग्य नसल्याचं या पक्षातील नेत्यांना वाटतंय. मुंबईत आढळली कोरोनाची नवी लक्षणे, हा त्रास झाला तर त्वरीत जा डॉक्टरांकडे त्यातूनच थोरात यांनी आपली नाराजी काल जाहीर व्यक्त केलीये. सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल निर्माण झालेले प्रश्न घेऊन काँग्रेसचे सर्व मंत्री आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. थोरात यांच्या कोकण दौ-यानंतर काॅंग्रेसला कोकण पुनर्वसनाच्या प्रक्रियेत किती स्थान मिळतं हे ठरणार आहे. त्यामुळे फक्त कोकणवासियांच्या दृष्टीने नाही तर काँग्रेसवासियांच्या दृष्टीनेही थोरातांचा कोकण दौरा महत्त्वाचा आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:

Tags: Devendra Fadnavis, Uddhav tahckeray

पुढील बातम्या