मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

देवेंद्र फडणवीसांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट, राऊतांकडून होणाऱ्या आरोपांवर खलबतं?

देवेंद्र फडणवीसांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट, राऊतांकडून होणाऱ्या आरोपांवर खलबतं?

देवेंद्र फडणवीसांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट, काय ठरलं भेटीत? वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीसांनी घेतली किरीट सोमय्यांची भेट, काय ठरलं भेटीत? वाचा सविस्तर

Devendra Fadnavis meet Kirit Somaiya: राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांची भेट घेतली आहे. मुंबईत झालेल्या या भेटीत नेमकं काय ठरलं? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

  • Published by:  Sunil Desale
तुषार रुपनवर, प्रतिनिधी मुंबई, 19 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) हे शिवसेनेच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. सोमय्या यांच्या या आरोपांना आता शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. इतकेच नाही तर शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आता भाजप नेत्यांवरही घोटाळ्याचे आरोप सुरू केले आहेत. या सर्वांमुळे राजकीय वातावरण तापले असतानाच आज राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे किरीट सोमय्यांच्या भेटीला पोहोचले. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि किरीट सोमय्या यांच्या भेटीत नेमकं काय झालं? यावरुन आता चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. (Devendra Fadnavis meet Kirit Somaiya) दोन्ही नेत्यांमध्ये 15 मिनिटे चर्चा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे ठाणे दौऱ्यावर होते. ठाण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे किरीट सोमय्यांना भेटायला पोहोचले. देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 15 मिनिटे चर्चा झाली. किरीट सोमय्या यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. वाचा : मुंबईत राज ठाकरेंच्या कार्यक्रमात स्टेज कोसळला, गोरेगावातील घटनेचा LIVE VIDEO भेटीत काय झालं? या भेटीसंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांना विचारले असता त्यांनी म्हटलं, देवेंद्र फडणवीस मला भेटण्यासाठी आले होते. आमच्या दोघांमध्ये पुढील रणनिती संदर्भात चर्चा झाली. पक्ष तुमच्या पाठीशी 100% उभा आहे, तुम्ही काळजी करण्याच कारण नसल्याच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. येत्या काळात आणखी काही प्रकरणे बाहेर काढली जाणार आहेत असंही किरीट सोमय्या म्हणाले. वाचा : "सुशांतसिंहच्या घरी काहीजण गेले, मंत्र्याची गाडी होती, बाचाबाची झाली आणि...." नारायण राणेंचा खळबळजनक दावा ईडीची धमकी देत सोमय्यांनी शेकडो कोटी गोळा केले - संजय राऊत काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले होते, मुंबईतील बिल्डर मुंबईतील व्यापारी यांच्याकडून ईडीच्या नावाने धमक्या देऊन या किरीट सोमय्याने आतापर्यंत शेकडो कोटी जमा केले आहेत. 8 jvpd स्कीम, सुजीत नवाब नावाचा एक प्लॉट आहे. तो प्लॉट किरीट सोमय्या आणि त्याचा मित्र अमित देसाई बिल्डर या दोघांनी मुळ मालकाला ईडीची धमकी देऊन 100 कोटी रुपयांचा प्लॉट त्याहूनही अधिक जास्त किमतीचा प्लॉट मातीमोल भावाने अमित देसाईंच्या नावाने करून घेतला. ईडीची धमकी देऊन हा प्लॉट आपल्या नावे करून घेतला आहे आणि त्यातले पंधरा कोटी रुपये किरीट सोमय्या यांनी कोणत्या ईडी अधिकाऱ्याला नेऊन दिले हे स्पष्ट करावं ईडीने... नाहीतर मी त्या अधिकाऱ्याचं नाव घेईल असंही संजय राऊत म्हणाले. बाप बेटे जेलमध्ये जाणार मी तुम्हाला काय सांगितलं भाजप पक्षाचे साडेतीन नेते जेलमध्ये जाणार, तुमची अपेक्षा होती की मी ती नावे काल सांगेल, जसे जसे ते आतमध्ये जातील तसे तसे तुम्ही मोजत जा. बाप बेटे नक्की जेलमध्ये जाणार, बाप बेटे 100% जेलमध्ये जात आहेत. दुसऱ्याला जेलमध्ये घालवायचे धमक्या देतात आता तुम्ही जा असंही संजय राऊत म्हणाले होते.
First published:

Tags: BJP, Devendra Fadnavis, Kirit Somaiya, Mumbai

पुढील बातम्या