Home /News /mumbai /

देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली तत्काळ मागणी, म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारकडे केली तत्काळ मागणी, म्हणाले...

'विविध शहरांमध्ये अडकलेले विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी जाऊ इच्छितात. त्यांनाही मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी''

    मुंबई, 11 मे : लॉकडाउनमध्ये अडकलेले परप्रांतीय मजूर आणि नागरिकांना आपआपल्या राज्यात जाण्यासाठी उपाययोजना सुरू आहे. राज्य सरकारकडूनही परप्रांतीयांना मोफत प्रवास दिला जात आहे. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारकडे आता स्थलांतरित राज्यांतर्गत मजुरांसाठी मागणी केली आहे. राज सरकारकडून राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात सोडण्यासाठी एसटी बसेस सेवा पुरवण्यात येत आहे. परप्रांतीयांना राज्याच्या सीमेवर नेऊन सोडण्यात येत आहे.  देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित कामगारांचा राज्यांतर्गत प्रवास 'एसटी'ने विनामूल्य करण्यासाठी राज्य सरकारने तत्काळ आदेश द्यावे, अशी मागणी केली आहे. तसंच विविध शहरांमध्ये अडकलेले विद्यार्थी त्यांच्या मूळ गावी जाऊ इच्छितात. त्यांनाही मोफत बस प्रवासाची सोय उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही फडणवीस यांनी राज्य सरकारकडे केली आहे. एसटी बसेसने 8 हजार मजुरांना सीमेपर्यंत सोडले तर दुसरीकडे मुंबईतून 8 हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवण्यात आले आहे. एसटी महामंडळाने आपल्या विविध आगारातील बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचवले आहे. नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे 250 एसटी बसेस द्वारे हमरस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करित चाललेल्या सुमारे 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले आहे. हेही वाचा - आजपासून मोदी सरकारकडून खरेदी करा स्वस्त सोनं, वाचा कशी कराल गुंतवणूक त्याचबरोबर परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे 3 हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले.अशा प्रकारे कल दिवसभरात सुमारे 8 हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे शिवधनुष्य एसटीने लिलया पेलले आहे. यापुढे देखील लाॅक-डाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे व तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणार आहे. तरी कष्टकरी कामगार-मजूरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा, असं आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड.अनिल परब यांनी केले आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Shivsena

    पुढील बातम्या